Goa Corona Vaccination Dainik Gomantak
गोवा

शंभर टक्के लक्ष्‍यपूर्ती धूसर : १५ नोव्‍हेंबरपर्यंत उद्दिष्‍ट गाठण्‍याचा प्रयत्न सुरूच

राज्यात दीड लाख लोक दुसऱ्या डोसविना

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्य सरकारने (Goa Government) राज्यातल्या शंभर टक्के नागरिकांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधक लसीकरण (Covid Vaccination) पूर्तता करण्‍याचा दावा केला आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या लसीकरणाचा वेग आणि लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता हे लक्ष्‍य गाठणे सद्यस्‍थितीत शक्‍य नाही. पहिला कोविड प्रतिबंधक डोस घेऊन 84 दिवस उलटून सुमारे दीड लाख लोक दुसरा डोस घेण्यासाठी तयार नाहीत. ते फिरकलेच नाहीत. त्‍यासाठी सरकारने अधिक कडक पावले गरजेचे आहे.

कोरोनाचे नवे संक्रमण आल्यास या लोकांना धोका वाढू शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्‍हणणे आहे. त्‍यामुळे लोकांनी सजग राहून दुसरा डोस घ्‍यावा, असे आवाहन केले आहे.

राज्य सरकारने रविवारी जाहीर केलेल्या महालसीकरण अभियानामध्ये केवळ 6 हजार 595 लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आणि आज सोमवारी 5 हजार 307 नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याबाबत प्रचंड अनास्था आहे.

सोमवारी 5307 जणांनी घेतला दुसरा डोस

राज्यातील शंभर टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. ही संख्या 12 लाख 46 हजार 143 आहे, तर लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या 9 लाख 44 हजार 847 आहे. गोवा लसीकरणाच्या दुसऱ्या डोसमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर असून सिक्कीम नंतर गोव्याचा क्रमांक लागतो.

पहिला डोस घेऊन 84 दिवस संपूनही सुमारे दीड लाख लोक दुसरा डोस घेण्यासाठी पुढे येत नाहीत, ही गंभीर बाब आहे. त्‍यासाठी सरकारने अधिक कडक पावले उचलणे गरजेचे आहे. कोरोना महामारीचे नवे संक्रमण आल्‍यास या लोकांना धोका वाढू शकतो. लोकांनी सतर्क राहून दुसराही डोस घ्‍यावा.

- डॉ. शेखर साळकर, कोरोना कृतीदलाचे सदस्‍य.

कोरोनाचे 24 तासांत 2 बळी

राज्यात कोरोना महामारी नियंत्रणात आहे. मात्र, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 2 नागरिकांचा बळी गेला. आतापर्यंत कोरोनाची 1 लाख 78 हजार 342 रुग्णांना लागण झाली असून त्यापैकी 1 लाख 74 हजार 686 रुग्ण बरे झाले आहेत. हे बरे होण्याचे प्रमाण 97.95 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 286 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोघांचा बळी गेल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 370 झाला आहे. गेल्या चोवीस तासांत 6 व्यक्तींना अधिक उपचारासाठी रुग्णालयात भरती केले जात आहे. तर 2 रुग्‍णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे. काल दिवसभर 2262 संशयित रुग्णांच्या चाचण्या आल्‍या. त्यापैकी 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनिल पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राहुल गांधींची 'जादूगार' टीपण्णी अन् भाजपचा पलटवार, लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले; राजनाथ सिंहांची माफीची मागणी

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

SCROLL FOR NEXT