Goa : Std. VII Book Dainik Gomantak
गोवा

Goa : पाठ्यपुस्‍तकात डॉक्‍टरांबद्दल आक्षेपार्ह मजकूर

Goa : सदर धडा त्‍वरित वगळावा : डॉक्‍टरांची शिक्षण संचालकांकडे मागणी

Mahesh Tandel

पणजी : इयत्ता सातवीच्‍या सोशल सायन्स (Social & Political Life 2) (सोशल ॲण्ड पॉलिटिकल लाईफ २) या नव्या पुस्तकात खासगी डॉक्टरांबद्दल आक्षेपार्ह मजकूर समाविष्ठ केल्याबद्दल राज्यातील खासगी डॉक्टरांनी त्‍याला आक्षेप घेतला आहे. सदर पाठ लिहिणाऱ्याला एखाद्या डॉक्टराकडून वाईट अनुभव आलेला असेल आणि त्याने आपला राग सर्व डॉक्टरांवर काढला असेल, अशी शक्यता व्‍यक्त केली आहे. सदर धडा पाठ्यपुस्‍तकातून (Educational Lesson) त्‍वरित वगळावा याबाबत आपण शिक्षण संचालकांना कळविले आहे, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

कॅन्सर तज्‍ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की, सातवीच्या पुस्तकात खासगी डॉक्टर गरज नसताना जास्त प्रिस्‍क्रिप्‍शन तथा औषधे लिहून देतात, असा उल्लेख आहे. या उल्लेखाला आपला आक्षेप असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले. डॉक्टर अनावश्‍‍यक औषधे कशी लिहून देतील? एखादा अपवाद त्‍याला असू शकतो. मात्र, विद्यार्थ्यांना या गोष्टी शिकवणार असाल, तर काही शिक्षक बाहेर शिकवणी घेतात तेही शिकवावे. वकील आशिलाला वाचवण्यासाठी त्याला खोटे बोलण्यास सांगतात, ते शिकवावे. सीए, वकील व इतर व्यावसायीक पावती न देता अतिरिक्त पैसे घेतात ते शिकवावे. राजकारणी नोकऱ्यांसाठी पैसे घेतात की नाही, याचा शोध घेऊन तेही शिकवावे, असे डॉ. साळकर यांनी म्‍हटले आहे. दरम्यान, फोंडा येथील स्‍त्री रोगतज्‍ज्ञ डॉ. रेखा दुभाषी यांनीही या धड्याबद्दल आक्षेप नोंद केला आहे.

आपण अद्याप तो धडा वाचलेला नाही. डॉ. शेखर साळकर यांनी आपणास त्‍याबाबत संदेश पाठवला आहे. आपण तो धडा वाचून सबंधितांचा सल्ला घेऊन योग्य ती प्रक्रिया करणार आहे.
- भूषण सावईकर, शिक्षण संचालक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT