A dilapidated building, in Mormugoa, Goa Pradeep Naik / Dainik Gomantak
गोवा

Goa: असुरक्षित इमारतींना नोटीसा दिल्या पण दखल कितींची घेतली

दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी इमारतींसंबंधी योग्य निर्णय घेण्याची गरज (Goa)

दैनिक गोमन्तक

येथे साडेचार वर्षापूर्वी दोन इमारतींचा काही भाग कोसळल्याने (Building Collapsed) मुरगाव पालिकेने (Mormugoa), पालिका क्षेत्रातील विविध इमारतींची पाहणी करून असुरक्षित (Unsafe) असलेल्या तीसपेक्षा अधिक इमारतींना नोटिसा (Thirty plus dilapidated buildings) दिल्या होत्या. त्यामध्ये मुरगाव पालिकेच्या मालकीच्या इमारतींचा समावेश होता. तथापी त्यापैकी कितीजणांनी त्या नोटिशीची दखल घेतली हे मुरगाव पालिकेला माहित आहे.येथील गोवा सहकार भांडारसमोर असलेली व जर्जर झालेली पुष्पांजली इमारत (Pushpanjalee Building) पूर्णपणे पाडण्यात येऊन त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्याचे काम सुरु झाले आहे. इतरांच्या बाबतीत नोटिसा पाठविणे व नोटिसा घेणे हा खेळ सुरु असल्याचे दिसत आहे. शहर भागातील निरनिराळ्या ठिकाणी मोडकळीस आलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींसंबंधी योग्य निर्णय घेण्यासाठी मालकांना नोटिसा द्याव्यात किंवा नागरिकांच्या हितासाठी मुरगाव पालिकेने स्वतः पुढाकार घेऊन त्या पाडाव्यात असे मागणी करणारे निवेदन प्रभाग क्रमांक तेराच्या नगरसेविका शमी साळकर यांनी मुरगाव पालिका मुख्याधिकारींना दिले आहे. एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी सदर इमारतीसंबंधी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे. (Goa)

Dilapidated buildings, in Mormugoa, Goa

येथे साडे तीन वर्षापूर्वी एका इमारतीचा सज्जा तसेच एका इमारतीमध्ये खालच्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये वरचे छत पूर्णपणे मोडून जमिनीवर पडले होते. छत खालच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये कोसळले तेव्हा सुदैवाने खालच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये कोणीच राहत नसल्याने दुर्दैवी घटना घडली नाही. या घटनानंतर येथील असुरक्षित इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्याने मुरगाव पालिकेने दखल घेताना असुरक्षित इमारतींची पाहणी फेब्रुवारी २०१७ सुरु केली. त्यावेळी तीसपेक्षा अधिक इमारती असुरक्षित असल्याच्या कारणास्तव संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यावेळी मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकारी दीपाली नाईक होत्या. त्यांनी या इमारतीसंबंधी व त्या खाली करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आल्याची माहिती दिली होती. तथापी त्यानंतरही संबंधितांकडून कोणतीही हालचाली झाल्या नाही. यानंतर मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनीही या इमारतींना नोटिसा पाठवून पाठपुरावा केला होता. मुरगाव पालिकेने त्या ३२ इमारतींना पालिका कायदाच्या १९० कलमाखाली नोटीसा जारी केल्या होत्या. त्यापैकी चार इमारती अशा आहेत की ज्या कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने त्या लवकरातलवकर खाली करण्याची सूचना त्यातील रहिवाशांना करण्यात आली होती. तथापी त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे सदर इमारतींसंबंधी निर्णय घेण्यासाठी सदर प्रकरण दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली होती. या दरम्यान वास्को पोलिस स्थानकासमोर असलेल्या एका भव्य व असुरक्षित इमारतीचा सज्जा खाली उभ्या असलेल्या कारवर कोसळून कारचे नुकसान झाले होते. त्यानंतर पूर्णपणे दुर्दशा झालेल्या व धोकादायक ठरलेल्या सदर इमारती खाली करण्यात याव्यात अथवा त्याचा बांधकाम सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना काही इमारती मालकांना करण्यात आली होती.

येथील मुरगाव पालिका मार्केटसमोर व भर बाजारात असलेल्या एका इमारतीच्या मालकाला तत्कालीन मुख्याधिकारी गौरिष शंखवाळकर यांनीही नोटिस दिली होती. सदर इमारत अति असुरक्षित असल्याने एक तर ती दुरुस्त करा किंवा पाडा अशी सुचना करण्यात आली होती. . वेळप्रसंगी ती इमारत सील करण्याचा इशारा देण्यात आला होता.तथापी अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. ज्या इमारतीना नोटिसा देण्यात आल्या होत्या यापैकी काही इमारतीचा काही भाग कधीही कोसळू शकेल असा स्थितीत आहेत. काही इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर काही इमारतीमध्ये अद्याप काहीजण जीवावर उदार होऊन त्यामध्ये राहतात. काही इमारतीसंबंधीचा वाद न्यायालयात असल्याने त्यासंबंधी इमारत मालकांना निर्णय घेता येत नाही.तर काही इमारती या हाऊसिंग सोसायटीच्या आहेत. त्यामुळे निर्णय घेणे कटकटीचे झाले आहे. पालिका आपल्यापरिने नोटिसा पाठवित आहेत. परंतू एकंदर अडचणीमुळे संबंधित निर्णय घेऊ शकत नाही. दुर्दशा झालेल्या इमारतींच्या यादीमधून मुरगाव पालिकेच्या मालकीच्या पाच इमारतीही सुटल्या नाहीत. त्यामुळे या इमारतींच्या भक्कमपणासंबंधी तपासणी करावी व त्यासंबंधीचा अहवाल द्यावा अशी विनंती गोवा इंजिनीयरिंग कॉलेजला तक्लालीन मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी केली होती. आता यापैकी काही इमारतीची डागडुजी सुरु करण्यात आली. परंतू असुरक्षित इमारतीपैकी काही इमारती भर वस्तीत आहेत. त्या किंवा त्याचा काही भाग कधीही कोसळून पडेल याचा नेम नाही. या इमारतीखालून लोकांची ये-जा चालू असते. या इमारतीत दुकाने, इतर कार्यालये असल्याने लोकांची गर्दी असते. जर या ठराविक इमारती कोसळल्या तर हाहाकार उडण्याची शक्यता आहे.स्थानिक प्रशासनाने संबंधित इमारतीच्या मालकांना नोटीसा दिल्यावरही ते गंभीर नसल्याचे दिसून येते. याउलट त्या नोटिसांना आव्हान देण्यासाठी त्यांची धडपड सुरु होते.या इमारतींच्या दुर्दशाकडे गंभीरतेने पाहून त्यासंबंधी कडक पाऊले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान शहर भागातील निरनिराळ्या ठिकाणी मोडकळीस आलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या इमारती संबंधी योग्य निर्णय घेण्यासाठी मालकांना नोटिसा द्याव्यात किंवा नागरिकांच्या हितासाठी मुरगाव पालिकेने स्वतः पुढाकार घेऊन त्या पाडाव्यात अशी मागणी करणारे निवेदन प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका शमी साळकर यांनी मुरगाव पालिका मुख्याधिकार्‍यांना दिले आहे. एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे. येथील जीर्ण व धोकादायक इमारतींच्या परिस्थितीबद्दल यापूर्वी आपण पत्र लिहिले होते. वास्को पोलीस स्थानकासमोरील इमारत हैप्पी अपार्टमेंट, मोती सदन, कोसंबी इमारत, हाऊसिंग बँक ऑफ महाराष्ट्र, गोसलिया इमारत, एमएमसी स्टाफ क्वार्टर्स या इमारतींची स्थिती अतिशय वाईट आहे. या इमारतींच्या खालून नागरिकांची ये-जा चालू असते. त्यांचे लहान लहान तुकडे कोसळत आहे. नागरिकांच्या समोर पडण्याचा काही घटना घडल्या आहेत असे निवेदनात म्हटले आहे. या इमारती जीर्ण झाल्याने प्रत्येक दिवशी या इमारतींचे सिमेंट कॉंक्रीटचे तुकडे कोसळून पडण्याचे प्रकार घडत असतात. डोळ्यादेखत एखाद्या दुर्दैवी घटना वाढ व्हावी याची आम्ही वाट पाहत आहोत काय असे वाटत आहे. या इमारती संबंधी योग्य कारवाई करण्यासाठी आपण सतत मुरगाव पालिका अधिकारी यंत्रणेला विनंती करत आहे. तेथे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी त्या पाडण्यासाठी योग्य ते सोपस्कार करावेत अशी विनंती साळकर यांनी केली आहे.मुन्सिपल स्टाफ क्वार्टर्सकडे लक्ष देऊन त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. या इमारतीमध्ये मुरगाव पालिकेचे कर्मचारी राहतात. त्या इमारती स्थिती दयनीय झाली आहे. सिमेंट काँग्रेसचे तुकडे कोसळत आहेत असे निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT