PM Modi Goa speech Dainik Gomantak
गोवा

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

PM Modi Goa Speech: या ऐतिहासिक प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मठाचे आणि गोव्याच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल गौरवपर उद्गार काढले.

Manish Jadhav

काणकोण: काणकोण तालुक्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या परिसरात शुक्रवारी (28 नोव्हेंबर) एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला. मठाच्या 550व्या वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली.

आशियातील सर्वात मोठी राम मूर्ती

पंतप्रधान मोदींच्या हस्ते या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या एका भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांनी मठाच्या परिसरात स्थापित केलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांच्या मूर्तीचे अनावरण केले. ही मूर्ती 77 फूट उंचीची असून ती कांस्य धातूची आहे. उंचीनुसार ही मूर्ती आशिया खंडातील सर्वात मोठी श्री रामांची मूर्ती असल्याचा दावा करण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या भव्य मूर्तीचे अनावरण होणे, ही मठासाठी आणि गोव्यासाठी अत्यंत गौरवाची बाब ठरली. या मूर्तीच्या स्थापनेतून गोव्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडली.

गोव्याने संस्कृती जपली: पंतप्रधान मोदी

या ऐतिहासिक प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मठाचे आणि गोव्याच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल गौरवपर उद्गार काढले. गोव्याने आपला वारसा कसा जपला याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "गोव्याने केवळ आपली मूळ संस्कृतीच जपली नाही, तर काळाच्या ओघात तिचे पुनरुज्जीवनही केले."

गोव्यावर अनेक शतके विविध राजवटींनी राज्य केले, ज्यामुळे येथील मूळ संस्कृती आणि परंपरांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. अशा स्थितीतही गोव्यातील लोकांनी आपला वारसा आणि जीवनशैलीतील मूळ घटक टिकवून ठेवले. पंतप्रधानांच्या मते, गोव्याच्या या प्रयत्नांमुळेच जुन्या धार्मिक विधी आणि प्रथांना आधुनिकतेची जोड देत गोव्याने आपला समृद्ध वारसा जगात अभिमानाने सादर केला.

पर्तगाळी मठ: परंपरा आणि आधुनिकतेचा भक्कम सेतू

पंतप्रधान मोदींनी या मठाच्या 550 वर्षांच्या वाटचालीचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, या 550 वर्षांत अनेक स्थित्यंतरे आली. परकीय राजवटी आणि सांस्कृतिक आक्रमणांना तोंड देत पर्तगाळी मठाने अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले. त्याला सामोरे जात पर्तगाळी मठाने समाजाला जोडले, एकसंध ठेवले," असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच, राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, "एकतेमधूनच राष्ट्र समृद्ध होते. पर्तगाळ मठाने हे कार्य यशस्वीपणे करुन दाखवले.''

मठाच्या कार्याचे कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी मठाला "परंपरा आणि आधुनिकतेचा भक्कम सेतू" असे संबोधले. याचा अर्थ मठाने आपल्या प्राचीन मूल्यांचे रक्षण केले, परंतु त्याचबरोबर आधुनिक विचारांना आणि बदलांना स्वीकारुन समाजसेवा केली. पंतप्रधान मोदींच्या या उपस्थितीमुळे श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठासारख्या संस्थांनी गोव्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रोशन रेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; वेगळ्या शाईने 'हाऊस नंबर', बार, नाईट क्लब शब्द घुसवले; न्यायालयात युक्तिवाद

...तर गोवा ही दुसरी मुंबई बनेल, खासगी जंगलांच्या दर्जाबाबत कोर्टानं व्यक्त केली चिंता

Goa Crime: नुवे घरफोडीत 'पारधी गँग'चा हात, मायणा कुडतरी पोलिसांनी मुंबईत आवळल्या एकाच्या मुसक्या

Provident Fund: कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही आता 'पीएफ', केंद्राच्‍या निर्देशांची राज्य सरकारकडून अंमलबजावणी सुरू

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल' चिंबलातच, सरकार ठाम; आंदोलकांचाही पवित्रा कायम, प्रकल्‍प 'तोयार'च्‍या प्रभाव क्षेत्रात की बाहेर? शुक्रवारी पाहणी

SCROLL FOR NEXT