Goa Fire Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Case: रेवोडात अग्नितांडव! शेकडो काजू कलमे जळून खाक, हजारोंचे नुकसान

Goa Fire Case: काजू कलमांसोबत लगतची आंब्याची अंदाजे 200 कलमे आणि 50 माड यांनाही या आगीची झळ बसली

Ganeshprasad Gogate

Goa Fire Case: रेवोडा चर्च- कोलवाळनजीक गणेश फट्टे यांच्या मालकीच्या काजू बागेला रविवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती हाती आली आहे.

आगीची तीव्रता एवढी होती की फट्टे यांची जवळपास शेकडो काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यंदा काजूचे अल्प पीक असून त्यात पुन्हा हे आगीचे संकट कोसळल्याने फट्टे कुटुंबीय हवालदिल झले आहे.

या घटनेसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी 5. 15च्या दरम्याने अग्निशमन दलाला रेवोडा येथे काजू बागेला आग लागल्याची महिती मिळाली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमनची टीम घटनास्थळी दाखल झाली.

मात्र तोपर्यंत वाऱ्यामुळे बागेतील आग भडकली आणि जवळपास हजारो कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काजू कलमांसोबत लगतची आंब्याची अंदाजे 200 कलमे आणि 50 माड यांनाही या आगीची झळ बसली.

अग्निशमनचे दलाचे ज्ञानेश्वर सावंत, स्वप्नेश कळंगुटकर, गिरीश गावास, दिलीप सावंत, परेश मांजरेकर या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत या आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत जवळपास लाखभराचे नुकसान झाल्याचे समजतेय. ही दुर्घटना कशी घडली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

यंदा काजूचे पीक कमी आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच काजू बी खरेदीचा दरही कमी झाल्याने बागांची साफसफाई, मजुरी, फवारणी याचा खर्च तरी सुटेल कि नाही अशा दुहेरी संकटात बागायतदार सापडला आहे.

त्यातच या अशा घटना घडल्याने शेतकरी मेटाकुटीला येत आहे. शासनाने काजू उत्पादनासाठी सबसिडी द्यावी अशी मागणी यानिमित्ताने होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT