People travelling From Maharashtra to Goa via Ferry service, At Terekhol, Keri, Goa  Nivrutti Shirodkar / Dainik Gonmantak
गोवा

Goa: तपासणीची बोंब, मात्र कोरोना चाचणी सक्तीची

शेजारच्या राज्यातून लोकांची चोरमार्गाने ये-जा वाढली (Goa)

Nivrutti Shirodkar

मोरजी: गोव्यात (Goa) प्रवेश करायचा असेल तर निगेटिव्ह सर्टिफिकेट (Corona Test Certificate) आणि दोन्ही लस झाले (Complete Vaccination) असतील तरच प्रवेश मिळतो, पण केरी तेरेखोल (Terekhol, Kerim) येथे गेल्यावर वेगळे चित्र दिसून येते. महाराष्ट्र भागातील लोक (People's of Maharashtra) केरी तेरेखोल फेरी बोटीच्या (via Ferry Boat Service) सहाय्याने गोव्यात थेट प्रवेश करतात (Entered into Goa), पहाटे पासून फेरी बोटी अगदी भरून येतात, मात्र गोवेकाराना महाराष्ट्रात जाता येत नाही. दोन्ही राज्यांच्या सरकारांनी संयुक्तरीत्या दोन्ही राज्याच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिक (Citizens of Goa) करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) तालुक्यातील चेक नाके संकटात (Check Post in Trouble) असून चोरवाटातून (Thieves way) काही बिगरगोमंतकीय (Non - Goan) व्यापारी (Businessman), मजूर (Labors), नागरिक (Citizens) शेजारच्या राज्यात ये-जा (Up & Down form nearby State) करत असतात, तेरेखोल येथे फेरीबोटीतून चोरमार्गाने रेडी (Redi), शिरोडा (Shiroda), आरोंदा (Aaronda), या भागातील नागरिक तेरेखोलला येत असत व तेरेखोल केरी फेरीबोटीतून ते सरळ राज्यात यायचे आपले व्यवहार करायचे व परत फेरीबोटीतून जात असत, त्यामुळे फेरीबोटीतून येणारे सर्वच जण तेरेखोल भागातील किंवा राज्यातील असायचे हे कुणीही सिद्ध करू शकत नव्हते, फेरीबोटीतून येणाऱ्याची कुणी चौकशी करत नाही.

शेजारच्या राज्याच्या सीमेलगत गावातील नागरिक, मासळी घेऊन केरी, किरंणपाणी भागात यायचे, शेजारच्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चेकनाक्यावर अस्वस्थता दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आणि चोरवाटातून राज्यात प्रवेश केला जात असल्याने नाकेही असुरक्षित बनले आहेत. तेरेखोल गावात एकूण 70 कुटुंब वास्तव्य करत आहेत ते अधिकाधिक शिरोडा, आरोदा, वेंगुर्ला भागात बाजारात जाऊन सामान आणायचे त्यांना तो भाग जवळचा होता, काही लोक केरी पेडणे बाजाराला यायचे पण या लॉक डाऊन काळात सिंधुदूर्ग भागातील नागरिक चोर मार्गाने तेरेखोल भागात येऊन फेरीबोटमार्गे राज्यात प्रवेश करायचे, व आजही चालू आहे. केरी तेरेखोल बोटीतून महाराष्ट्र येथील नागरिक मोठ्या संख्येने येतात त्याची कोणीच तपासणी करत नाही. सरकारने फेरी बोट सेवा हि फक्त कोरोना काळात तेरेखोल वासीयांच्या सेवेसाठी कार्यरत केली आहे, या सेवेचा गैरवापर होताना दिसत आहे. तो सरकारने थांबवावा अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pro Kabaddi League Final 2025: दबंग दिल्ली पुन्हा कबड्डी 'चॅम्पियन'! जिंकला PKL 12चा किताब; फायनलमध्ये पुणेरी पलटनची कडवी झुंज अपयशी

Raigad Fort: मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी; 'किल्ले रायगड'

Kuldeep Yadav Record: परदेशी मैदानांवर कुलदीपची 'जादू'! चहलला पछाडून बनला 'नंबर 1' भारतीय गोलंदाज; ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधली किमया VIDEO

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT