निलेश परवार dainik gomantak
गोवा

गोवा: डोंगुर्ली ठाणे पंचायतीच्या सरपंचपदी निलेश परवार

अलिखीत करारानूसार प्रजिता गावस (Prajita Gavas) यांनी काही दिवसांपुर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.

Dainik Gomantak

वाळपई : डोंगुर्ली ठाणे ग्रामपंचायतीचे (Dongurli Thane Gram Panchayat) बिनविरोध सरपंच निवडलेले निलेश परवार (Nilesh Parvar) बाजूस उपसरपंच सूर्यकांत गावकर (Suryakant Gavkar) पंच लता गावकर, प्रजिता गावस, सत्यवान गावकर, उमेश सावंत (Umesh Sawant), सरिता गावकर व केरी. जि.पं.स. देवयानी गावस व इतर. (पद्माकर केळकर)

सत्तरी तालुक्यातील डोंगुर्ली ठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निलेश परवार यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. अलिखीत करारानूसार प्रजिता गावस (Prajita Gavas) यांनी काही दिवसांपुर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानूसार आज शुक्रवारी सरपंच पदासाठी पंचायतीच्या कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी निलेश परवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. निवडणूक अधिकारी राजेश दळवी यांनी अर्जाची छाननी करुन अर्ज ग्राह्य ठरविले.

निलेश परवार यांना सुचक म्हणूव सत्यवान गावकर, अनुमोदक म्हणून सुर्यकांत गावकर यांनी समर्थन दिले. यावेळी उपसरपंच सूर्यकांत गावकर, पंच लता गावकर, प्रजिता गावस, सत्यवान गावकर, उमेश सावंत, सरिता गावकर मिळून सर्व पंचांची उपस्थिती होती.

पंचायतीचे सचीव सर्वेश गावकर यांची उपस्थिती होती. सर्व सोपस्कार केल्यावर निवडणूक अधिकारी राजेश दळवी यांनी सरपंच म्हणून निलेश परवार यांचे नाव घोषीत केले. त्यानंतर पंच सदस्यांनी निलेश परवार यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. केरी जिल्हा पंचायत सदस्य सौ. देवयानी गावस यांचीही उपस्थिती होती. तसेच अन्य नागरिकांनी निलेश परवार यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT