गोवा डेअरी घोटाळा’ चौकशीसाठी  सहकार उपनिबंधकांची नियुक्ती  

milk
milk

पणजी: गोवा (Goa) राज्य सहकारी दुग्ध उत्पादन संघ लि. (Goa Dairy) मधील गैरव्यवहार तसेच घोटाळ्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या चौकशीसाठी सहकार उपनिबंधक ए. एस. महात्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश सहकार निबंधक अरविंद खुटकर यांनी काढला आहे. (Deputy Registrar of Co-operation has been appointed to probe the Goa Dairy scam)

राज्यातील विविध डेअरी संस्थांच्या सुमारे 53 सदस्यांनी सह्यांनिशी गोवा डेअरीवर प्रशासक समितीची नियुक्ती केल्यानंतर झालेल्या गैरव्यवहार, भ्रष्टाचार तसेच घोटाळेसंदर्भातची तक्रार 17 जानेवारी 2021 रोजी दाखल केली होती. आर्थिक वर्ष 2019- 20च्या अंतिम वर्षाच्या लेखा परीक्षकाच्या चौकशीसाठी वैधानिक लेखी परीक्षकाची नेमणूक करण्यात यावी. 

सल्लागाराची नेमणूक करण्यात यावी. जुन्या धान्याच्या पोत्यांची विक्री, निकालात काढणे व त्याची उचल, पावडर व लोणी रुपांतरणासाठी सुटे दुध पाठविणे, बनावट ऑटोमेटीक लोणीचे पॅकिंग मशीन, निवडून आलेल्या मंडळाने घेतलेले निर्णय, दुधामधील पोषकद्रव्यसंदर्भात कार्यक्रमांचे आयोजन न करणे, दुधाच्या प्रकारामध्ये गुणवत्ता व प्रमाणात बदल, नाताळ सणावेळी विक्री करण्यात आलेले दूध, दुग्ध उत्पादन, आईसक्रिम व गुरांचे खाद्य, गोवा दुग्ध संघाच्या सुवर्ण महोत्सव बनवाट व बेकायदेशीर सोहळा, एप्रिल 2020 पासून गोवा डेअरीच्या नफ्यासंदर्भात देण्यात आलेल्या चुकीची माहितीसंदर्भातच्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com