Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub: हडफडेतील अग्नितांडवानंतर बेकायदा क्‍लबचा मुद्दा ऐरणीवर; कळंगुट, बागात जागा मिळेल तेथे क्‍लब, सामान्य नागरिक हैराण!

Goa Nightclub Fire: नाईट क्लब, पबच्‍या वाढत्या विळख्‍याने त्रस्‍त सामान्‍यांच्‍या जखमा भळभळू लागल्‍या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

यशवंत सावंत

कळंगुट: हडफडेतील अग्नितांडवानंतर बेकायदा क्‍लबचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, कारवाईसाठी अधिकाऱ्यांमध्‍ये चढाओढ लागली असतानाच, कळंगुट- बागा आणि कांदोळी भागातील नाईट क्लब, पबच्‍या वाढत्या विळख्‍याने त्रस्‍त सामान्‍यांच्‍या जखमा भळभळू लागल्‍या आहेत.

‘वाट दिसेल तेथे व मोकळी जागा मिळेल तेथे क्‍लब, पब उभारणी होत आहे. ना पार्किंग, ना कसली सुरक्षा. रात्रीच्‍या वेळी आम्‍हा स्‍थानिक महिलांना घराबाहेर पडणे मुश्‍‍कील होऊन बसले आहे. आंबटशौकीन पर्यटकांकडून ‘चलती है क्या’ या प्रश्‍‍नाने सहनशीलतेच्‍या सीमा ओलांडल्‍या आहेत’, अशी व्‍यथा हळर्णकर नामक महिलेले प्रस्‍तुत प्रतिनिधीकडे व्‍यक्‍त केली.

‘हे क्‍लब, पब कायद्याच्‍या चौकटीत असतील का?’, असा हताश सवाल त्‍या करतात. अनेक स्‍त्रीयांची ही घुसमट आहे, स्‍थानिक पंच, सरपंच, आमदारांच्‍या दहशतीखाली वर्षानुवर्षे ‘सहन’ केले जात आहे. काही कुटुंबांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर दांडे ठेवण्‍यास सुरुवात केली आहे.

तळघरातील क्‍लब सुरक्षित?

बरेच क्‍लब हे तळघरातील अरुंद प्रवेशद्वाराचे आहेत. तसेच पाडकामाचे आदेश असूनही अर्धवट मोडलेल्या धोकादायक इमारती लोकांच्या जीविताला धोका निर्माण करत आहेत.

ऑनलाईन कमी दर असतानाही प्रवेशासाठी पर्यटकांकडून १५ हजार रुपये घेतले जात असून, आत गेल्यावर खर्च करण्याचा दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी पर्यटकांनी केल्या आहेत. रेंट गाडी दिसताच दलाल पर्यटकांना अडवून क्लबमध्ये नेण्यासाठी भाग पाडतात. क्लबसाठी किमान ५० दलाल सक्रिय आहेत.

कळंगुट : भाग व आक्षेपार्ह क्‍लब

गावडावाडा (२), उमटावाडा (१), नायकवाडा (४), सकलावाडा (१), खोब्रावाडा (४), सावंतवाडा (१) ह्या लोकवस्‍ती असलेल्‍या परिसरात बरेच क्‍लब, डान्‍सबार सुरू आहेत. पार्किंगची सुविधा नसतानाही लोकवस्तीत उभे राहिलेल्या या क्लबांमुळे रस्त्यांवर वाहनांचा गराडा पडतोच; पण महिलांनाही अनेक गैरअनुभवांना सामोरे जावे लागते.

बेकायदा नाझरी हॉटेलवर मेहेरनजर

हडफडे दुर्घटनेनंतर नागरिकांचे डोळे उघडले असून, आमदारांचे नाझरी हॉटेल बेकायदेशीर असूनही पाडले जात नाही, यावरून लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. आमदारांना या सर्व बेकायदेशीर बाबींची माहिती असूनही ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

मुलींना लग्‍नासाठी स्‍थळेही मिळेनात

‘इथल्या मुलींना स्‍थळ मिळणे अवघड झाले आहे. कळंगुटमधील मुलगी नको, असा सूर आहेच; शिवाय तेथील मुलांनाही लग्‍नास सहजगत्‍या मुली मिळत नाहीत’, असा अनुभव काहींनी नाव न जाहीर करण्‍याच्‍या अटीवर व्‍यक्‍त केला.‍ त्यामुळे सामाजिक बदनामी वाढली आहे.

ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही; तरीही...

कळंगुट पंचायत क्षेत्रात १३ क्‍लब/डान्स बार बेकायदेशीर ठरले आहेत. तरीही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. बंद पाडण्याचे आदेश दिलेले असतानाही, काहींनी सत्र न्यायालयातून स्थगिती आणून ते क्लब सुरू ठेवले आहेत. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नसतानाही हे बार चालवले जात होते. यावर कारवाई का होत नाही, प्रशासनाची कमजोरी काय आहे, हे सर्वांना माहीत आहे, अशी माहिती पंचायतीच्या प्रतिनिधींनी दिली.

महत्वाचा मोहरा हाती

बर्च क्लबचा भागीदार असलेल्या अजय गुप्ताला गोवा पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेत गोव्यात आणले आहे. संशयितास दिल्लीतील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यास हणजुण पोलिस स्थानकांत आणण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Banks New Verification Rule: ऑनलाइन फ्रॉडला आता 'ब्रेक'! देशभरातील बँकांकडून पडताळणीच्या नियमांमध्ये मोठे बदल

Goa Illegal Sand Mining: पोलीस आले-गेले, 'खेळ' सुरुच! म्हादई पात्रातून छुप्या मार्गाने रेती वाहतूक; प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थ संतप्त

गोव्यातील खेड्यापाड्यात, दुर्गम भागात पोहोचणार स्टारलिंकचे हायस्पीड इंटरनेट; CM सावंतांची इलॉन मस्कच्या कंपनीसोबत चर्चा

VIDEO: 14 षटकार, 9 चौकार... वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! आशिया कपमध्ये 171 धावांची तुफानी खेळी

Goa Crime: विवाहीत असून जबरदस्तीनं अल्पवयीन मुलीशी केलं लग्न, मुख्य आरोपीसह आई व दोन नातेवाईक अडकले; कोर्टाकडून आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT