Davorlim News: Dainik Gomantak
गोवा

Goa News: दवर्लीत मशिदीवरील भोंगे हटवा; दुर्गा माता मंदिर समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

8 महिन्यांपासून पाठपुरावा करूनही कारवाई नाही

Akshay Nirmale

Dovorlim News: दवर्ली येथील मशिदीवरील भोंग्यांचा आवाज थांबवावा, या मागणीसाठी येथील दुर्गा माता मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी आज, गुरूवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

दुर्गा माता मंदिर समितीचे अध्यक्ष रजनीकांत तेंडुलकर म्हणाले की, गेल्या 8 महिन्यांपासून सातत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. वारंवार मागणी करूनही यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जावी, असे आमचे मत आहे. न्यायालयानेच याबाबत निर्देश दिले आहेत. त्या निर्देशांचे पालन करावे आणि ध्वनी प्रदुषणाच्या समस्यातून आमची सुटका करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या भेटीनंतर रजनीकांत तेंडुलकर म्हणाले की, आरतीवेळी त्यांचा भोंगा सुरू होतो. त्याचा आवाज कानठळ्या बसवणारा आहे. त्याचा त्रास परिसरात होतो. याबाबत आमदार उल्हास तुयेंकर यांचीही भेट घेतली होती. त्यांनी याबाबत पोलिस अधीक्षकांकडे पाठपुरावा केला होता.

ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत. दोन्हीकडील बाजू ऐकून घेण्यासाठी बैठक घेण्याचे ठरले आहे. 6 नोव्हेंबर रोजी ही बैठक होणार आहे. त्यातून या समस्येवर काही तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT