Court Canva
गोवा

Goa News: जमीन हडप प्रकरणात समीर कालिदास सातार्डेकर यांना जामीन मंजूर; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Live News Blog 14 October 2025: राजकारण, पर्यटन, गुन्हे, अपघात, कला - क्रीडा - संस्कृती, दिवाळी, पर्पल फेस्ट यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

गोवा वीज विभागाने बेकायदेशीर बांधकामांना नवीन वीज जोडण्यांबाबत परिपत्रक केले जारी

गोवा वीज विभागाने बेकायदेशीर बांधकामांना नवीन वीज जोडण्यांबाबत परिपत्रक जारी केले आहे.

मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नांडिस स्पष्ट करतात: ईएचएन क्रमांक घरांना कायदेशीर दर्जा देत नाहीत.

३० सप्टेंबर २०२५ रोजीचे परिपत्रक, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राप्त झाले.

जमीन हडप प्रकरणात समीर कालिदास सातार्डेकर यांना जामीन मंजूर

एसआयटीच्या जमीन हडप प्रकरणात रिअल इस्टेट क्षेत्रातील समीर कालिदास सातार्डेकर यांना म्हापसा न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यांना १० ऑक्टोबर रोजी बनावट कागदपत्रे आणि फसवणूकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि २५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती, ज्यात गुन्हे शाखेला नियमित हजर राहणे समाविष्ट आहे.

दबाव झुगारून साखळीत काँग्रेस पक्ष उभारी घेणार - अमित पाटकर

२०२२ साली साखळी मतदारसंघात काँग्रेस पक्षाने भाजपची दमछाक केली होती. त्यात अल्प अशा मतांच्या आघाडीने मुख्यमंत्री पास झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकांना लक्ष्य करून दबाव घालण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्ष साखळीत सक्रिय आहे. केवळ लोक खुल्यापणाने बोलत नाही. पण काँग्रेस पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते संघटीत असून येणाऱ्या काळात साखळीत काँग्रेस पक्ष ठामपणे साखळीतील जनतेबरोबर राहणार न उभारी घेणार. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी साखळी येथे केले

रस्त्याच्या कडेला स्वयंपाक केल्याबद्दल पर्यटकांना १०,००० रुपयांचा दंड

हणजूण पोस्ट ऑफिसजवळ रस्त्याच्या कडेला मिनी गॅस सिलिंडर वापरून स्वयंपाक करताना पकडल्यानंतर, पोलिसांनी पाच पर्यटकांना सार्वजनिक सुरक्षा आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एकूण १०,००० रुपयांचा दंड ठोठावला.

गॅस सिलिंडर वितरणाच्या वादातून कामगारावर हल्ला; 3 आरोपींना अटक

गॅस सिलिंडर वितरणाच्या वादातून एका कामगारावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्यातील तीन आरोपींना पोलिसांनी राजस्थानमधून मोठ्या प्रयत्नांनी अटक केली आहे.

8 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

दीपक देसाई समाज कल्याण खात्याचे संचालक. नागरी सेवेतील 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. कार्मिक खात्याकडून आदेश जारी.

वास्कोतील बसस्थानक स्थलांतरास विरोध

मुरगाव पालिका मंडळाच्या सोमवारी (ता. १३) झालेल्या साधारण सभेत कदंब बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात शहरातील एचपीसीएलने मोकळ्या केलेल्या जागेत हलविण्याचा प्रस्ताव, तसेच फॉर्म्युला ४ रेसमुळे बोगदा येथे झालेल्या रस्ते व पायाभूत सुविधांच्या तोडफोडीविषयी गरमागरम चर्चा झाली. याशिवाय नळजोडणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची अट, पे-पार्किंग, विविध सौंदर्यीकरण प्रकल्पांसह महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार 20 ऑक्टोबरपूर्वी

सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार 20 ऑक्टोबरपूर्वी दिला जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Mayem Lake:  मये तलावाला येणार 'अच्छे दिन', 1 नोव्हेंबरपासून मिळणार पर्यटनाला चालना

जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या मये तलावाला येणार 'अच्छे दिन'. एक नोव्हेंबरपासून मिळणार पर्यटनाला चालना. नवीन कंत्राटदार नियुक्त. आमदार प्रेमेंद्र शेट यांची माहिती.

वास्को-कुळे रेल्वे महिनाभरासाठी बंद

वास्को ते कुळे व परत या मार्गावरील रेल्वेगाडी १६ ऑक्टोबरपासून ३१ दिवस बंद राहणार आहे. वास्को ते केळशीदरम्यान लोहमार्गावर सुरक्षाविषयक काम केले जाणार असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत ही गाडी बंद ठेवण्याचा निर्णय दक्षिण-पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

पोलिस भरतीत बनावट गुणपत्रिका सादर; माजी नाभिकावर गुन्हा

पणजी: भरती प्रक्रियेत बनावट गुणपत्रिका सादर करून पोलिस खात्यात नोकरी मिळवल्याच्या आरोपावरून एका माजी नाभिकाविरोधात पणजी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयिताचे नाव प्रेमानंद माजगावकर (माजी नाभिक) असे असून, त्याच्यावर बीएनएस कलम ३३६(३) आणि ३४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कलमे अनुक्रमे फसवणुकीच्या हेतूने बनावट कागदपत्र तयार करणे आणि खोटे कागदपत्र खरे म्हणून वापरणे या गुन्ह्यांशी संबंधित आहेत.

4.74 कोटी रुपये गमावले; तिसवाडीत 72 वर्षीय वृद्धाची ऑनलाईन फसवणूक

तिसवाडी येथील ७२ वर्षीय वृद्धाची ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली ४.७२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. राज्यातील आजवरची ही सर्वात मोठी फसवणूक आहे. खोट्या आयपीओच्या आमिषाला बळी पडून वृद्धाने पैसे गमावले आहेत.

श्रीस्थळ येथे मालमत्तेच्या वादातून दोन ज्येष्ठ नागरिकांना शेजाऱ्यांकडून गंभीर मारहाण

श्रीस्थळ – काणकोण येथे मालमत्तेच्या वादातून दोन ज्येष्ठ नागरिकांना शेजाऱ्यांकडून गंभीर मारहाण करण्यात आली आहे. दोघांनाही उपचारासाठी मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आम्ही पोलिस आहोत! पर्वरीत अज्ञात टोळक्याने पिकअप ट्रकमधून चोरी केले आठ लाख रुपये

पोलिस असल्याचे सांगत पिकअप ट्रकमधून अज्ञात टोळक्याने आठ लाख रुपये चोरी केल्याची घटना पर्वरीत घडली आहे. पैशांची चोरी केल्यानंतर चोरटे दुचाकीवरुन फरार झाले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT