Uday Bhembre Dainik Gomantak
गोवा

Goa Live News: चुकीचा मथळा, भेंब्रेनी केला बातमीचा निषेध; जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Today's Live News: गोव्याचे राजकारण, संस्कृती, कला - क्रीडा, पर्यटन, गुन्हे यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.

Pramod Yadav

चुकीचा मथळा; भेंब्रेनी केला बातमीचा निषेध

'जामीन घेणार नाही' अशा मथळ्याखाली बातमी छापल्याबद्दल ॲड. उदय भेंब्रे यांनी एका वृत्तपत्राचा निषेध . आपण असे सांगितलेच नाही भेंब्रेंचे स्पष्टीकरण.

आंतराष्ट्रीय स्थरावर गोवा पर्यटन 'नंबर वन' तर खवंटे पर्यटन मंत्री ऑफ द इयर

गोव्याने ITB बर्लिन 2025 मध्ये महत्त्वपूर्ण मान मिळवला आहे. गोव्याने प्रतिष्ठित PATWA आंतरराष्ट्रीय पर्यटन पुरस्कार मिळवले, ज्यामुळे भारतातील एक अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून गोवाची बाजू मजबूत झाली आहे. विशेष म्हणजे, गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांना 'पर्यटन मंत्री ऑफ द इयर - इंडिया' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पर्वरीत जलवाहिनी फुटली; पाण्याची नासाडी

तिस्क, पर्वरी (जुना बाजार) जंक्शनवर खोदकामादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटली. पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी.

मंदिर किंवा झाडाला कोणतेही नुकसान नाही

सेंट इनेझ येथील मंदिर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि जवळच्या झाडावर कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही सखोल शोरिंग (सपोर्ट) काम केले आहे आणि कोणताही धोका टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाय योजले आहेत.

अनमोड घाटावर अलीशान कारला आग; एकूण सहा लाखांचे नुकसान

अनमोड घाटावर सकाळी एका अलीशान कारला अचानक आग लागली.फोंडा अग्नीशामक दलाच्या जवांनानी आग विझवली. या अपघातात एकूण सहा लाखांचे नुकसान झाले आहे.कुळे पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनखाली हवलदार गुणो दमेकर याचा आणखीन तपास करीत आहेत.

सरकारकडून अध्यात्मिक पर्यटनाला चालना

आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संस्कृतीचे जतन करत यांना प्रोत्साहन देण्यासाठी, कला आणि संस्कृती विभागाकडून तपोभूमीला १.५ कोटी रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीये. हे अनुदान आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यास मदत करेल, ज्यामुळे गोव्याची समृद्ध धार्मिक परंपरा जपली जाईल. तसेच, प्रदर्शनच्या खर्चासाठी ५ कोटी रुपयांच्या एक्स-फॅक्टो मंत्रिमंडळाकडून मंजूर झाला आहे.

25 कोटी भरून सरकार विकत घेणार अर्बन बँकेची नंदादीप इमारत; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

म्हापसा अर्बन बँकेच्या नंदादीप इमारतीसाठी २५ कोटी रुपये भरून सरकार इमारत विकत घेणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत श्रीमती चंद्रभागा उच्च माध्यमिक विद्यालय विजयी

गोवा क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय U19 आंतर उच्च माध्यमिक विद्यालय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कुडचडेतील श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिक विद्यालय संघानी जेतेपद मिळविले.

दहावीची परीक्षा देणाऱ्या मयडे येथील विद्यार्थ्यांने संपवले आयुष्य

दहावीची परीक्षा देणाऱ्या मयडे येथील साईराज संतोष नाईक (वय १७) या विद्यार्थ्यांने आयुष्य संपवले आहे. साईराज यावर्षीची दहावीची परीक्षा देत होता. दरम्यान, राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु आहे.

ताडमाड देवस्थान सांतिनेज पणजी येथील गटाराची संरक्षक भिंत कोसळली

ताडमाड देवस्थान सांतिनेज पणजी येथील गटाराची संरक्षक भिंत कोसळली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजधानी पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका बसल्यामुळे भिंत कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कसल्ले, उसगांव येथून पाच वर्षीय मुलगी पासून बेपत्ता, तक्रार दाखल

कसल्ले, उसगांव येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलगी काल पासून बेपत्ता. फोंडा पोलिसांनी अपहरण म्हणून तक्रार नोंद केली असून, त्या दृष्टीने तपास सुरू.

राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत श्रीमती चंद्रभागा उच्च माध्यमिक विद्यालयाचे जेतेपद

गोवा क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय U19 आंतर उच्च माध्यमिक विद्यालय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कुडचडेच्या श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संघानी जेतेपद मिळविले.

अंतिम लढतीत श्रीमती चंद्रभागा उच्च माध्यमिक विद्यालयाने हरमल पंचकोषी उच्च माध्यमिक विद्यालयाला २० धावांनी पराभव करून जेतेपद मिळविले.

शिवरायांबाबत वक्तव्य, लेखक उदय भेंब्रे यांच्या विरोधात डिचोलीत पोलिस तक्रार

शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी ज्येष्ठ विचारवंत उदय भेंब्रे यांच्या विरोधात डिचोली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भेंब्रे यांचा निषेध करीत शिवप्रेमींकडून पोलिसांना निवेदन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT