पत्नीच्या हत्येप्रकरणी मडगाव सत्र आणि जिल्हा न्यायालयाने गुलशन तिर्कीला जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
मडकई येथील गोवा इस्पात कंपनीत रंगकाम करत असताना वसील ( वय वर्ष 22, उत्तर प्रदेश) नामक कामगाराचा जमिनीवर कोसळून मृत्यू झाला. गुरुवारी (15 मे) संध्याकाळीची धक्कादायक घटना घडली. म्हार्दोळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
गोव्यात सध्या अवकाळी पावसाने धूमशान घातले आहे. गेल्या तीन दिवसांपासून गोव्यात पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. राजधानी पणजीसह राज्यातील विविध ठिकाणी पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. यातच आता, हवामान विभागाने 19 आणि 20 मे रोजी यलो अलर्ट जाहीर केला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते राजन घाटे यांनी कुंभारवाडा, अंजुना येथील ग्रामस्थांसह डीआयजी वर्षा शर्मा यांची भेट घेतली. कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि शिवोलीच्या आमदार दिलायल लोबो यांच्यावर मालमत्तेत अतिक्रमण केल्याबद्दल आणि कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे तोडफोड केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली. हणजूण पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये 48 तासांच्या आत त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
गोव्यात पुढील तीन तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दोन्ही जिल्ह्यात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गोव्यात अणुऊर्जा प्रकल्प उभा राहणार असे कधीही म्हटले नाही. पण जे काही नवीन विकास होत आहेत, त्यांचा अभ्यास करायला हवा. गोव्यातील लोकांसाठी जे सर्वोत्तम आहे ते प्रदान करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही ते करण्यास तयार आहोत. आप आणि काँग्रेसने मला काय करावे हे सांगू नये, मी त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे: मंत्री सुदिन ढवळीकर
सांगे, सावर्डे व सत्तरी मतदारसंघात दीडशे कोटी खर्चुन यापूर्वी घाततेल्या वीज बंच केबल्सचा काहीही फायदा सरकार व लोकांनाही झाला नाही. याबाबत आमदार, सरपंचांनी आवाज उठवला पाहिजे. - वीजमंत्री सुदीन ढवळीकर
काँग्रेसच्या काळातील अनेक वीज मीटर रीडर अजूनही कंत्राट पद्धतीवर आहेत, त्यांना आता कायमस्वरुपी करणार. मंत्री सुदिन ढवळीकर यांची ग्वाही.
संजीवनी साखर कारखान्याच्या पूर्वीच्या सर्व ऊस उत्पादकांना सरकारचे आर्थिक अनुदान चालू राहणार की जे सध्या ऊसाचे उत्पन्न घेत आहेत त्यांनाच मिळणार याबाबत संभ्रम. माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे ते पूर्वीप्रमाणे सर्वांना मिळणे आवश्यक. याबाबत लवकरच गोमंतक ऊस उत्पादक संघटनेची बैठक घेऊन त्यात पुढील दिशा ठरवली जाईल. अध्यक्ष राजेंद्र देसाईंची माहिती.
वाळपई पोलिसांची धडक कारवाई करत, केरी तपासणी नाक्यावर ४०० किलो बेकायदेशीर गोमांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी कर्नाटकातील वसीम आदमसाब होंगल व सुहैल अहमद एस अत्तर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.