Goa News | Dainik Gomantak
गोवा

Goa News: फोनच्या अतिवापरामुळे 'या' गोष्टींचा धोका

विचारवेध व्याख्यानमालेत सेलफोनच्या वापर मर्यादेबद्दल प्रत्येकाने आत्मशोध घेणे व संशोधन करणे आवश्यक असल्याचे निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: सेलफोनच्या वापराला जरी 30 वर्षांपूर्वी सुरवात झालेली असली तरी कालांतराने त्याचा वापर अमर्याद होत चालला आहे. सेलफोन जसे वरदान तेवढेच धोकादायकही आहेत. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व आहे. त्यामुळे सेलफोनद्वारे जे आचारविचार व्यक्त केले जातात त्याला कायदा अडवू शकत नाही.

सेलफोनमुळे समाजस्वास्थ्यही बिघडू लागले आहे. विज्ञान जेवढ्या वेगाने प्रगती करीत आहे, त्याला कायदा गाठू शकत नाही. त्यामुळेच सेलफोनच्या वापर मर्यादेबद्दल प्रत्येकाने आत्मशोध घेणे व संशोधन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी काल केले.

गोमंत विद्या निकेतनने आयोजित केलेल्या विचारवेध व्याख्यानमालेच्या दामोदर कृष्ण वेर्लेकर स्मृती व्याख्यानात ‘कायदा, समाजस्वास्थ्य व सेलफोन’ याविषयावर त्यांनी अनेक उदाहरणे प्रस्तुत करून आपले विचार व्यक्त केले.

गुन्हेगारांकडून गैरवापर

सेलफोनने गुन्हा करणे सोपे करून टाकले आहे. सेलफोनद्वारे आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढलेल्या आहेत. गुन्हेगारी जगताने सेलफोन वापरण्यात मोठे प्रावीण्य मिळवलेले आहे. माहितीची चोरी होऊ लागली आहे, लैंगिक शोषण वाढलेले आहे, सेलफोनपासून दूर राहिलो तर काय होईल ही भीती वाढलेली आहे, अशी माहिती भाटकर यांनी दिली.

आत्‍मपरीक्षण ही काळाची गरज

समाजस्वास्थ्य राखण्यासाठी धाक निर्माण करणे गरजेचे आहे. सेलफोनच्या बाबतीत कायदा केवळ धाक निर्माण करू शकतो. आता ज्या 50 ते 70 वयाच्या व्यक्ती आहेत त्यांनी आपले अगोदरचे जीवन सेलफोनशिवाय जगले असेल. त्यामुळेच या वयोगटातील व्यक्तींनी आत्मपरीक्षण करावे व आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना काय मार्गदर्शन करावे हे ठरवावे, असा सल्लाही भाटकर यांनी याप्रसंगी दिला.

कायद्यासाठी सेलफोन वरदान आहे. पोलिस यंत्रणांना किंवा कायद्याच्या संदर्भात विचार करताना, माहिती मिळविण्यासाठी, गुन्हेगार शोधून काढण्यासाठी, गुन्हेगार व बळी ठरलेल्या व्यक्तीमधील संभाषण शोधून काढण्यासाठी, पुरावे शोधून काढण्यासाठी सेलफोन उपयोगी आहे.

जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून सेलफोनद्वारे आपण माहिती मिळवू शकतो, एकमेकांना पाहू शकतो, संभाषण करू शकतो, असे भाटकर यांनी सांगितले.

कायदा व समाज एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. सेलफोनमुळे माणसाचा स्वत:कडील संवाद कमी झालेला आहे. लहान मुलांमध्ये व्यसने वाढलेली आहेत. अश्लील, विभत्स असे साहित्य, दृश्‍ये पाहणे सोपे झालेले आहे.

सुसंस्कृतपणाची, सभ्यतेची पातळी उतरलेली आहे. समाजस्वास्थ्य बिघडत आहे. त्यामुळे या सर्वांपासून मुलांना, तरुणांना, समाजाला दूर कसे ठेवावे हा मोठा प्रश्र्न उपस्थित झाला आहे. - मृदुला भाटकर, निवृत्त न्यायमूर्ती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

PF Withdrawal New Rule: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफ खात्यातून ॲडव्हान्स काढण्याचे बदलले नियम; आता किती वेळा काढता येणार पैसे?

Sattari Heavy Rain: सत्तरी तालुक्यात चक्रीवादळाचे धुमशान; शेकडो झाडे उन्मळून पडली; घरे, वीजवाहिन्यांचे नुकसान; अग्निशमन दलाची धावपळ

Income Tax: क्रेडिट कार्डने इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनो सावधान! एका चुकीमुळे होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान; आधी 'हा' नियम वाचाच

Bengaluru Crime: रात्रभर शोधलं, पण सकाळी थेट मृतदेहच सापडला! बॉयफ्रेंडला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून 20 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन; बंगळुरुत खळबळ

SCROLL FOR NEXT