Vasco Fish vendors Dainik Gomantak
गोवा

Vasco News : मासळी विक्रेत्या महिलांचा आक्रमक पवित्रा

खारीवाडा-वास्को येथील प्रकार : मासळी विक्रीवरून नगराध्यक्षांना घातला घेराव

गोमन्तक डिजिटल टीम

खारीवाडा-वास्को येथील घाऊक मासळी मार्केटमधील व रस्त्याच्या कडेला मोक्याच्या ठिकाणी बसून मासळी विक्री करणाऱ्या लमाणी मासळी विक्रेत्यांचा व्यावसाय तेजीत चालला असून याचा मासळी मार्केटमधील विक्रेत्यांच्या व्यावसायावर परिणाम होत आहे.

तसेच पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांना दिलेला शब्द न पाळल्यामुळे मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्या महिलांनी सोमवारी (ता.१५) पुन्हा पालिकेत येऊन नगराध्यक्षांना घेराव घालून जाब विचारला व घाऊक मासळी विक्रेते व रस्त्यावर बसून मासळी विक्री करणाऱ्या लमाणी महिला विक्रेत्यांवर जर कारवाई होत नाही तर आम्ही पालिकेसमोर बसून मासळी विक्री करणार असल्याचा इशारा नगराध्यक्षांना दिला आहे.

मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्या व घाऊक मासळी विक्रेते तसेच रस्त्याशेजारी मोक्याच्या ठिकाणी बसून मासळी विक्री करणाऱ्या लमाणी मासळी विक्रेत्यांमधील शीतयुद्ध अजून संपत नाही. वास्कोतील नियोजित मासळी मार्केट प्रकल्प होण्यास विलंब लागला तो या मासळी विक्रेत्यांमुळे. खारीवाडा येथील घाऊक मासळी विक्रेत्यांनी आपला व्यावसाय पुन्हा थाटल्याने याठीकाणी मासळी खव्वयांची गर्दी वाढत आहे.

म्हणून प्रकल्प रखडला

खारीवाडा येथील घाऊक मासळी विक्रेत्यांमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तसेच रस्त्यावर बसून मासळी विक्री करणाऱ्या लमाणी मासळी विक्रेत्यांचाही उच्छाद वाढत आहे. या दोन्ही विक्रेत्यांवर कारवाई करा व त्यांचा व्यवसाय बंद करा तेव्हाच मासळी मार्केट प्रकल्पाला हात घाला अन्यथा आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा आग्रह मासळी मार्केटमधील महिला मासळी विक्रेत्यांनी वारंवार धरला व हा प्रकल्प रखडत गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Milk Analogue Products: अस्सल दुधाच्या नावावर स्वस्त 'ॲनालॉग' ची विक्री; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना मेन्यू आणि बोर्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक

Horoscope 23 Saptember 2026: पैशांच्या बाबतीत बुधवार महत्त्वाचा दिवस! संपत्ती आणि समृद्धीचे नवे मार्ग मोकळे; 'या' राशींच्या बँक बॅलेन्समध्ये होणार भरघोस वाढ

Goa Rakshan Yatra: काँग्रेस कार्यकर्त्यांना 'ऊर्जा'; शेकडोंच्या उपस्थितीत 'गोवा रक्षण यात्रे'ला प्रारंभ, 40 मतदारसंघांत 27 दिवसांचा दौरा

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

SCROLL FOR NEXT