Goa New Taxi Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Goa New Taxi Policy: टॅक्सीच्या नव्या धोरणावरुन संभ्रमात असलेल्या टॅक्सी व्यावसायिकांनी मंत्रालयाबाहेर गर्दी केली आहे. व्यावसायिकांनी सरकारकडून स्पष्टतेची मागणी केलीय.

Pramod Yadav

पर्वरी: टॅक्सीच्या नव्या धोरणावरुन टॅक्सी व्यावसायिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. नव्या धोरणाबाबत चर्चा करण्याचे सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत व्यावसायिकांनी बुधवारी (१० सप्टेंबर) मंत्रालयाबाहेर गर्दी केली. मुख्यमंत्र्यांनी मात्र व्यग्र असल्याचे सांगत, चर्चेसाठी पुन्हा आमंत्रण दिले जाईल, असा संदेश पोलिसांकरवी पाठवला. पण, व्यावसायिकांनी मंत्रालय परिसर सोडण्यास नकार दिला.

“टॅक्सीबाबत नवीन धोरण निश्चित करण्यासाठी टॅक्सी व्यावसायिकांसोबत चर्चा केली जाईल. यासाठी टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले होते. चतुर्थीच्या काळात गोड बातमी मिळेल असेही सांगण्यात आले होते. पण, १० सप्टेंबर उजाडले तरी कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. आम्ही सरकारवर विश्वास ठेवला अन् त्यांनी आम्हाला फसवलं. या विषयात आम्हाला स्पष्टता हवी आहे,” असे एका व्यावसायिकांने माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा करण्याची मागणी करत असलेल्या टॅक्सी व्यावसायिकांना चर्चेसाठी दुसरा एखादा दिवस दिला जाईल, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकरवी दिला. मुख्यमंत्री इतर कामांमध्ये व्यस्त असल्याची माहिती डीवायएसपी करपे यांनी व्यावसायिकांना दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय मंत्रालय परिसर सोडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

“टॅक्सीचे धोरण ठरविण्यासाठी व्यावसायिकांना विश्वासात घेतले जाईल, असे स्पष्ट केले असताना मंत्रालयाबाहेर गर्दी करुन आंदोलन करण्याचे काहीच कारण नाही.  त्यांनी सरकार आणि माझ्यावर विश्वास ठेवायला हवा, आम्ही मसुद्यावर विचार करत आहोत, तो नव्याने तयार करुन प्रसिद्ध करण्यापूर्वी व्यावसायिकांना चर्चेसाठी बोलवले जाईल”, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आंदोलनकर्त्या व्यावसायिकांना विनाकारण वेळ वाया न घालविण्याचे आवाहन केले आहे. तसेच, धोरणाच्या मसुद्यावर चर्चा होईल त्यावेळी किमान २० टॅक्सी व्यावसायिकांना चर्चेसाठी बोलवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT