Goa Ferry Boat Services Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat Services: रायबंदर-चोडण मार्गावर 2 कोटींचा नवीन फेरी धक्का, पण रो-रो फेरीबोटींचा पत्ताच नाही!

Rai Bandar Chodan Ferry: रायबंदर-चोडण मार्गावर रो-रो फेरीबोटीसाठी रायबंदर बाजूकडील नवीन धक्का बांधून पूर्ण झाला आहे. तरी सरकारने घोषणा केलेल्या दोन रो-रो फेरीबोटींचा पत्ता नाही. नवीन धक्क्याची रुंदी ३० मीटर आहे व लांबी ३८ मीटर आहे. यामुळे ३ ते ४ फेरीबोटी एकाच वेळी थांबू शकतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa New Rai Bandar Jetty Ready No Sign Of Promised Ro Ro Ferries

तिसवाडी: रायबंदर-चोडण मार्गावर रो-रो फेरीबोटीसाठी रायबंदर बाजूकडील नवीन धक्का बांधून पूर्ण झाला आहे. तरी सरकारने घोषणा केलेल्या दोन रो-रो फेरीबोटींचा पत्ता नाही. मात्र, या नवीन धक्क्यावर तेथे असलेल्या दुसऱ्या फेरीबोटीद्वारे वाहतूक गेल्या रविवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने चोडण नागरिक व या मार्गावरील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

पणजी स्मार्ट सिटीच्या (Panaji Smart City) देखरेखीखाली बांधण्यात आलेला हा रायबंदर फेरी धक्का गोवा राज्यातील सर्वात मोठा असल्याची माहिती कंत्राटदार राजेश हळदणकर यांनी दिली. जुना धक्का फक्त ७ ते ८ मीटर रुंद होता. आता नवीन धक्क्याची रुंदी ३० मीटर आहे व लांबी ३८ मीटर आहे. यामुळे ३ ते ४ फेरीबोटी एकाच वेळी थांबू शकतात. यासाठी सरकारला २ कोटी ७ लाख रुपये खर्च करावे लागले आहेत.

सोमवारी (14 एप्रिल) सायंकाळी एका फेरीबोट चालकाने चोडणहून आलेली फेरीबोट नवीन धक्क्यावर लावण्यास विलंब केला. फेरीबोटीत असलेल्या प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ रिकॉर्ड करून प्रवाशांना कसे वेठीस धरतात, याविषयीची तक्रार नदी परिवहन खात्याचे वरिष्ठ अधिकारी विक्रमसिंग भोसले यांच्याकडे केली असता त्यांनी याची त्वरित दाखल घेऊन या फेरीबोट चालकाची मडकई मार्गावर त्वरित बदली केली.

नवीन फेरीबोटी मे महिन्यात

नदी परिवहन खात्याचे वरिष्ठ अधिकारी व या मार्गावर देखरेख करणारे अधिकारी विक्रमसिंग भोसले यांनी सांगितले की, या मार्गावर वाहतूक (Transportation) करण्यासाठी दोन फेरीबोटी येत्या मे महिन्याच्या पाहिल्या आठवड्यापासून सुरू होतील. या दोन्ही फेरीबोटींचे काम अंतिम टप्यात असून केरला-कोचीन डॉकवरून या फेरीबोटी १ मेपर्यंत गोव्यात पोहोचतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rivers: गोव्यातील नद्यांना धोका! मासेमारी संकटात, गावे पुराच्या विळख्यात सापडण्याची शक्यता; वाचा NIOचा अहवाल

Ganesh Chaturthi 2025: 4 पिढ्यांपासून मातीच्या गणेशमूर्तींची परंपरा, केरी सत्तरी येथील ‘बाबल्याची शाळा’

"मी सोमवारी गोव्यात येतोय", पुण्यातला 'तो' पर्यटक देणार कळंगुट पंचायतीला उत्तर; Watch Video

Porvorim Mapusa: सरकारचे 'साबांखा' खाते गुंडाळून ठेवण्याची गरज! पर्वरी-म्हापसा रोडवरून आप आक्रमक; बाईक राईड काढून निषेध

Shramdham Yojana: ‘श्रमधाम’मधून 100 घरे बांधणार! तवडकरांची घोषणा; 10 हजार कार्यकर्ते जोडणार

SCROLL FOR NEXT