prasad lolayekar Dainik Gomantak
गोवा

Sadetod Nayak : नवीन शैक्षणिक धोरण 2020चा फायदा काय? गोव्याच्या शिक्षण सचिवांनी दिलं उत्तर

सरकार, पालक आणि शिक्षकांनी एकत्रित आल्यास धोरण होणार यशस्वी

दैनिक गोमन्तक डिजिटल

नवीन शैक्षणिक धोरण 2020 मुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होणार आहे. शिक्षकांना आणखी काही वर्षे प्रशिक्षण दिले जाईल. या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी आणि कामकाजासाठी सरकार, पालक आणि शिक्षक यांना एकत्रितपणे पुढे जावे लागेल, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर म्हणाले.

‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात लोलयेकर यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 बद्दल माहिती ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांना दिली.

ते म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची तयारी आणि अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. या धोरणाची अंमलबजावणी पायाभरणीपासून सुरू होईल. या शैक्षणिक धोरणांतर्गत ३ ते ८ वयोगटातील मुलांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भर दिला आहे.

कारण या वयोगटात लहान मुलांच्या मेंदूचा संपूर्ण विकास होतो. हे नवीन शैक्षणिक धोरण बनवण्यासाठी तज्ज्ञांचे बरेच संशोधन झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणीसाठी पालकांचे सहकार्य आणि संवेदनशीलता आवश्यक आहे. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा शिक्षक, पालक आणि सरकार एकत्र येऊन काम करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांचा विश्‍वास

विशेष समिती स्थापन करणार

शिक्षण सचिव लोलयेकर म्हणाले की, नवीन धोरणानुसार शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मूल्यमापन केले जाईल. पण हे सावधपणे होईल. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदने अद्याप या मुल्यांकनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत.

मुलांसाठी अभ्यासक्रमाची चौकट आणि स्थानिक मजकूर तयार करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. नवीन धोरणांतर्गत डी.एड. अभ्यासक्रम नसल्याचा खुलास देखील त्यांनी केला.

शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर

सुमारे १२०० शिक्षकांना ६ जूनपासून आठ दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. असे प्रशिक्षण आणखी काही वर्षे सर्व शिक्षकांना दरवर्षी दिले जाईल. शिक्षण विभागाने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. सर्व शैक्षणिक संस्थांना या पोर्टलवर २ हजार रुपये नोंदणी शुल्क भरून नोंदणी करावी लागेल.

अंगणवाडी शिक्षिकांनाही नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे. पंचायत क्षेत्रातील शैक्षणिक समित्यांना ३ वर्षांच्या मुलांची माहिती गोळा करावी लागणार आहे.

‘पंच कोश’ सिद्धांतावर धोरण

नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे ‘पंच कोश’ सिद्धांतावर आधारित आहे, जे ‘तैत्तिरीय उपनिषद’मधून घेतले गेले आहे. हा सिद्धांत जागरूकतेच्या पाच स्तरांबद्दल आहे. यामुळे लहान वयातच मुलांना त्यांची एकाग्रता, योग्य संवाद, समज, व्यावहारिक ज्ञान आणि विविध कौशल्ये वाढविण्यात मदत होईल, असे मत शिक्षण सचिवांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT