सासष्टी: नवीन बोरी पुलासाठी केवळ ७० हजार चौरस मीटर जागा संपादन केल्याची माहिती पर्यावरण मंत्री तथा नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी दिली आहे. एरव्ही या पुलासाठी १ लाख २० हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता होती. पण शेत व खाजन जमिनीचा व शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार करुन आता केवळ ७० हजार चौरस मीटर जागा संपादन केल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी पेक्षा कमी जागा संपादन करण्यात येत असल्याने लवादाचा अनुकुल आदेशच असले अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. आपण सदैव शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिलो असून त्यांच्या प्रत्येक मागणीवर सहानभुतीपुर्वक विचार केल्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचे म्हणणे आहे. आपण या शेतकऱ्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घडवून आणली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडे थेट आपले म्हणणे मांडता आले. त्यातून जमीन संपादन कमी झाले असेही सिक्वेरा यांनी सांगितले.
स्थानिक शेतकऱ्यांनी (Farmers) राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली असून लवादाने सुनावणी यापूर्वी कित्येकवेळा पुढे ढकलली. आता ही सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार असून सर्वांनाच लवादाच्या आदेशाची प्रतिक्षा आहे.
दरम्यान, अजूनही शेतकरी समाधानी नसल्याचे कळते. सागरी प्रभाव क्षेत्राचे (सीआरझेड) उल्लंघन केल्याचे कारबोट, माकाझान, बेबडो मुंडकार संघटनेचे अध्यक्ष आलबर्ट पिन्हेरो यांचे म्हणणे आहे. एरव्ही बोरी पुलासाठी २२७,८०० चौरस मीटर जागा लागणार आहे व सध्या जी जागा दाखवण्यात येत आहे ते केवळ आमच्या डोळ्यांना पाणी पुसण्यासाठी आहे, असेही पिन्हेरो यांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.