Vijaykumar Natekar Dainik Gomantak
गोवा

Goa: वृक्ष संवर्धनाची गरज- राजेश पाटणेकर

वनमहोत्सव आदी माध्यमातून दरवर्षी कितीतरी झाडे लावण्यात येतात. झाडे लावली एवढ्यावरच आपली जबाबदारी संपत नाही, तर झाडांची योग्यरित्या निगा राखून त्यांचे संवर्धन आणि जतन करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: वनमहोत्सव आदी माध्यमातून दरवर्षी कितीतरी झाडे लावण्यात येतात. झाडे लावली एवढ्यावरच आपली जबाबदारी संपत नाही, तर झाडांची योग्यरित्या निगा राखून त्यांचे संवर्धन आणि जतन करणे आवश्यक आहे. तसे केले तरच झाडे लावण्यामागील हेतू सफल होईल. असे प्रतिपादन सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी केले.

डिचोली (Dicholi) भाजप मंडळाच्या वृक्ष लागवड आणि स्वच्छता अभियानचा शुभारंभ केल्यानंतर सभापती श्री. पाटणेकर बोलत होते. या अभियान अंतर्गत बुधवारी डिचोली पालिकेच्या प्रभाग- 1 (एक) मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष पुंडलिक (कुंदन) फळारी यांच्यासह प्रभागाचे नगरसेवक विजयकुमार नाटेकर (Vijaykumar Natekar) दीपा शिरगावकर, दीपा पळ माजी नगरसेवक अजित बिर्जे, भाजप मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, तुळशीदास परब, सचिन साळकर, मकरंद परब आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

भाजपचे वृक्ष लागवड व स्वच्छता अभियान संपूर्ण मतदारसंघात राबविण्यात येणार आहे. अशी माहीती विश्वास गावकर यानी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

SCROLL FOR NEXT