Goa: NCB arrested 24 people in 11 month in drugs smuggling
Goa: NCB arrested 24 people in 11 month in drugs smuggling Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यात NCBच्या कारवाया,24जणांना अटक मोठ्या प्रमाणात आम्ली पदार्थ जप्त

दैनिक गोमन्तक

कोरोनाचे निर्बंध (COVID-19) सुरू असतानाही राज्यात अमली पदार्थांचा (Drugs) सुळसुळाट आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) गेल्या आठ महिन्यांत 11 कारवायांमध्ये 24 जणांना अटक केली आहे. यात 10 विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत साडेतीन कोटींहून अधिक असल्याची माहिती विभागाचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे यांनी दिली. (Goa: NCB arrested 24 people in 11 month in drugs smuggling)

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू सिनेजगताला धक्का देणारा होता, पण या धक्क्याबरोबर बॉलिवूडचा विद्रूप चेहराही बाहेर आला आहे. एनसीबीने अटक केलेल्या व्यक्तींच्या जबाबातून मुंबईबरोबर गोव्याला टार्गेट केले आहे. गेल्या वर्षापर्यंत झिरो केस असलेल्या गोव्यात केवळ आठ महिन्यांत 24 जणांना अटक केली असून अनेक जण बॉलिवूडशी संबंधित असल्याची माहितीही पुढे आली आहे.

तीन दिवसात तीन धाडी

5 अटकेत गेल्या तीन दिवसात एनसीबीने उत्तर गोव्यात चोपडे, कारवाईत जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये एलएसडी, एमडीएमए, कोकेन, चरस, गांजा, हेरॉईन, मॅकेड्रोना हे पदार्थ असून ज्यांना भारतामध्ये बंदी आहे. अटक केलेल्या 10 परदेशी नागरिकांमध्ये सर्वाधिक 8 नायजेरियन असून कांगो, स्वित्झर्लंड आणि साऊथ आफ्रिकन यांचा समावेश आहे.

नागोवा, शिवोली येथे केलेल्या कारवाईमध्ये 5 जणांना अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: मडगाव पोलिस स्टेशन समोरच स्वत:ला भोकसले, परप्रांतीय व्यक्ती गंभीर जखमी

Vasco News : मुरगावात मान्सूनपूर्व कामे रखडली; पालिकेला मुहूर्त मिळेना

Lok Sabha Elections : अतिआत्मविश्वास कधीच बाळगला नाही : डॉ. दिव्या राणे

Loksabha Election Voting : सहा महिन्‍यांपासून तयारी, मेहनत! म्‍हणूनच मतदानाचा टक्‍का वाढवण्‍यात भाजपला आले यश

Lairai Devi Jatra 2024 : लईराई जत्रा यंदाही ‘गोबी’मुक्त; देवस्थान समितीचा दावा

SCROLL FOR NEXT