Navratri Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Navratri Festival : घोटेली-सत्तरीत सार्वजनिक नवदुर्गा उत्सवाचे आयोजन

Navratri 2022: विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Navratri 2022: घोटेली नं 2 केरी-सत्तरी येथील सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे 26 ते 5 ऑक्टोबरपर्यंत नवदुर्गा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 27 रोजी संध्याकाळी 4.00 वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा (तांदळाच्या पिठापासून गोड पदार्थ) व रात्री मोर्ले-सत्तरी येथील दांडिया पथकाकडून दांडिया नृत्य करण्यात येणार आहे.

28 रोजी संध्याकाळी 7 वाजता केरी-विर्डी येथील कलाकारांतर्फे कळशी नृत्य, कुणबी डान्स व समई नृत्य स्पर्धा, 29 रोजी संध्याकाळी 4 वाजता 15 वर्षांखालील मुलामुलींसाठी चित्रकला स्पर्धा, 7 वाजता महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा व रात्री 9 वाजता दांडिया नृत्य होईल.

30 रोजी संध्याकाळी 4 वाजता 40 वर्षांवरील नागरिकांसाठी अभंग गायन स्पर्धा, संध्या. 7.00 वाजता 15 वर्षांखालील मुलांमुलींसाठी नृत्य स्पर्धा होईल. 1 रोजी संध्याकाळी 4 वाजता बालकलाकार घुमट आरती मंडळ घोटेलीतर्फे घुमट आरती, 5 वाजता केरी मर्यादित पुरस्कृत रांगोळी स्पर्धा, रात्री 8.00 वाजता दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

2 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री आजोबा महाराज पंगड केरीतर्फे पर्यावणपूरक आकाशकंदील स्पर्धा (केरी, पर्ये व मोर्ले पंचायत मर्यादित), दुपारी 3 वाजता अखिल गोवा फुगडी स्पर्धा होईल. यात पहिले 7777 रु., दुसरे 5555 रु. व तिसरे 3333 रु. व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

3 रोजी दुपारी 3 वाजता अभंग गायन स्पर्धा केरी, मोर्ले, पर्ये पंचायत मर्यादित, संध्या. 6 वा. सिद्धकला नृत्य संस्था साखळीतर्फे भरतनाट्य, लोकनृत्य व इतर नृत्य दांडिया नृत्य होणार आहे. 4 रोजी सकाळी 11.30 वाजता बक्षीस वितरण सोहळ्याला माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह रावजी राणे व विजयादेवी राणे, प्रमुख वक्ते ॲड. रमाकांत खलप, संयुक्त मामलेतदार श्रीपाद माजिक, सरपंच दीक्षा चंद्रकांत गावस, उपसरपंच भिवा नारायण गावस, पंच राजेश तुकाराम गावस उपस्थित असतील.

संध्याकाळी 4 वाजता फुलांचा हार बनवण्याची स्पर्धा, तर 6 वा. 15 वर्षांखालील लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा होईल. 5 रोजी संध्याकाळी 4 वा. दिंडीसह दुर्गादेवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक व नवदुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT