Goa National Games|
Goa National Games| Dainik Gomantak
गोवा

National Games in Goa: 'गोव्यात यंदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणारच'

दैनिक गोमन्तक

National Games in Goa: यंदा गोव्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन निश्र्चित असून शक्यतो ऑक्टोबर - नोव्हेंबर 2023 दरम्यान, आयोजित केल्या जातील. मात्र, तारखा येत्या दोन महिन्यात निश्‍चित होतील, असे केंद्रीय राज्य पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

काल नावेलीतील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये तीन दिवसीय सहाव्या पेंच्याक सिलाट फेडरेशन कप या मार्शल आर्ट स्पर्धेचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

सध्या भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या घटनेत थोडा बदल झाला असून दोन महिन्यात असोसिएशनची बैठक होऊन तारखा निश्‍चित होतील,असे ते म्हणाले.

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोव्याची तयारी पूर्ण झाली असून आम्हाला थोडा वेळही मिळाला, हे चांगले झाले, असे गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्षही असलेल्या मंत्री नाईक यांनी सांगितले. पेंच्याक सिलाट या क्रीडा प्रकाराचाही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याचा आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

उदघाटन सोहळ्यात गोवा पेंच्याक सिलाट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी स्वागत केले.

गोवा संघाची कर्णधार मारिया फुर्तादो हिने सर्व खेळाडूंना शपथ देवविली. भारतीय पेंच्याक सिलाट महासंघाचे अध्यक्ष किशोर प्रकाश येवले, संचालक मोहमद इक्बाल उपस्थित होते.सूत्रसंचालन श्रीकृष्ण नाईक यांनी केले. साझू पाल यांनी आभार मानले.

पेंच्याक सिलाट फेडरेशन कप स्पर्धेत 16 राज्यातील 800 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले असून ते सर्व 264 पदकांसाठी खेळतील.

गोवा संघही सहभागी झाला असून त्यांना या खेळातील देशातील सर्वोत्तम संघ असलेल्या जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, हरयाणा सारख्या राज्यातील खेळाडूंशी मुकाबला करावा लागेल.

जम्मू-काश्मीरच्या सर्वाधिक 60 हून अधिक खेळाडूंचा समावेश असून ही स्पर्धा ज्युनियर मुली व मुलगे तसेच सिनियर महिला व पुरूष गटांमध्ये होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT