Nitin Gadkari Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी! गोव्यातील राष्‍ट्रीय महामार्गांसंदर्भातील 151 कोटींचे 5 प्रकल्‍प प्रलंबित; लोकसभेत गडकरींनी केला खुलासा

Nitin Gadkari: केंद्र सरकारने गेल्‍या दहा वर्षांत राष्‍ट्रीय महामार्गांसंदर्भात गोव्‍यासह सर्वच राज्‍यांसाठी मंजूर केलेले ६४३ प्रकल्‍प प्रलंबित आहेत. या सर्व प्रकल्‍पांचा खर्च सुमारे ४.१३ लाख कोटी रुपये इतका आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राष्‍ट्रीय महामार्गांसंदर्भात गेल्‍या दहा वर्षांत गोव्‍यासाठी मंजूर झालेले पाच प्रकल्‍प अजूनही प्रलंबित आहेत. या प्रकल्‍पांचा खर्च सुमारे १५१ कोटी रुपये असल्‍याचे केंद्रीय रस्‍ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

केंद्र सरकारने गेल्‍या दहा वर्षांत राष्‍ट्रीय महामार्गांसंदर्भात गोव्‍यासह सर्वच राज्‍यांसाठी मंजूर केलेले ६४३ प्रकल्‍प प्रलंबित आहेत. या सर्व प्रकल्‍पांचा खर्च सुमारे ४.१३ लाख कोटी रुपये इतका आहे.

त्‍यात गोव्‍यातील पाच प्रकल्‍पांचा समावेश असून, त्‍यांचा खर्च १५१ कोटी असल्‍याचे मंत्री गडकरी यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते. २०१४–१५ या आर्थिक वर्षात मंजूर करण्‍यात आलेल्‍या प्रकल्‍पांपैकी सुमारे १.१५ लाख कोटी रुपये खर्चाचे १५८ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प सध्‍या कार्यान्वित करण्यात आले आहेत.

परंतु जमीन, आवश्‍‍यक पर्यावरणीय अटी आदींसारख्‍या कारणांमुळे महामार्गांसंदर्भातील अनेक प्रकल्‍प प्रलंबित राहिलेले आहेत. या प्रकल्‍पांसाठी जमीन संपादन तसेच आवश्‍‍यक पर्यावरणीय दाखले मिळवण्‍याचे काम मंत्रालयाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

हे दाखले मिळताच या प्रकल्‍पांना गती देण्‍यात येणार असल्‍याचेही मंत्री गडकरी यांनी उत्तरात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT