Goa Narkasur Dainik Gomantak
गोवा

Goa Narkasur: गोव्यात नरकासुराचे दहन; 'व्होकल फॉर लोकल'चे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यभरात नरकासूर वध स्पर्धा उत्साहात

Akshay Nirmale

Goan Burns Narkasur effigies: गोव्यात 12 नोव्हेंबरच्या पहाटे 'नरकासुर' या असूराच्या प्रतिकात्मक प्रतिकृतींचे दहन करून दिवाळी साजरी करण्यात आली. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना सण साजरा करण्यासाठी स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले.

गोव्यात नरकासुराचे पुतळे बनवण्याची आणि दीपावलीला जाळण्याची परंपरा आहे. वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतिक म्हणून नरकासूर रूपातील प्रतिकृतीचे दहन केले जाते. यानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी नरकासूर स्पर्धादेखील होतात.

भगवान कृष्णाची वेशभूषा केलेला कलाकार पहाटेच्या वेळी नरकासूराचा वध करतो. अशा प्रकारे गोव्यात दिवाळीची सुरवात झाली आहे.

'नरकासुर वध' करण्याची परंपरा पोर्तुगीज राजवटीतही राज्यात अस्तित्वात होती, परंतु धार्मिक स्वातंत्र्यावरील निर्बंधांमुळे ती दबून राहिली. पोर्तुगीज राजवटीतून मुक्ती मिळाल्यानंतर ही परंपरा गोव्यातील तरुण पिढीने पाळली आहे.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, दिवाळीच्या दिव्यांनी राज्यातील एकात्मतेच्या भावनेने लोकांचे मन आणि हृदय उजळून निघावे. गोव्याचा विकास झपाट्याने होत आहे. गोव्यातील जनतेने सुशासनाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

राज्यात 'वोकल फॉर लोकल'ला महत्त्व देऊन स्वयंपूर्ण गोव्याच्या खऱ्या अर्थाने घरगुती उत्पादकांना पाठिंबा देण्यासाठी, उत्सव साजरा करण्यासाठी स्थानिक उत्पादने खरेदी करण्यावर अधिक जोर देऊया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT