Goa Music Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Music Festival: गोव्यात अलौकिक कलेची संस्कृती अन् भारतीय संगीतात भोग नव्हे योगाला महत्त्व!

Goa Music Festival: ‘स्वस्तिक’तर्फे आयोजित ‘स्वरमंगेश’ संगीत महोत्सवाचे शानदार उद्‍घाटन...

दैनिक गोमन्तक

Goa Music Festival: गोमंत भूमी ही अभिजात कला भूमी आहे, कारण अलौकिक कलेची संस्कृती गोव्यात आहे. भारतीय अभिजात संगीतात योगाला महत्त्व आहे, भोगाला नव्हे, असे प्रतिपादन विख्यात प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी कदंब पठारावरील गेरा स्कूलच्या श्रोतागृहात केले. ईडीसीचे चेअरमन सदानंद तानावडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले.

स्वस्तिक आयोजित व एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ स्कूल ऑफ लिबरल आर्टस प्रस्तुत मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती स्वरमंगेश संगीत महोत्सवात प्रमुख वक्ते या नात्याने डॉ. उपाध्ये बोलत होते. कला आस्वादात प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसाद महत्त्वाचा असतो आणि आत्मानंदाची भूमिका सर्वव्यापी आहे असे स्पष्ट करून ‘अभिजात संगीत आणि आत्मानंद’ या विषयावर डॉ. उपाध्ये यांनी विवेचन केले.

व्यासपीठावर एमआयटी लिबरल स्कूलच्या डॉ. प्रीती जोशी, लोकमान्य मल्टिपर्पजच्या एमडी सई ठाकूर बिजलानी, राजदीप बिल्डर्सचे मालक राजेश तारकर, आश्रयदाते विनयकुमार मंत्रवादी, स्वस्तिकच्या सचिव योगिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्‌घाटनापूर्वी प्रसिद्ध व्हायोलिनवादक मिलिंद रायकर यांचे प्रभावी व्हायोलिनवादन झाले. त्यांना अमर मोपकर यांनी तबला साथ दिली.

सदानंद तानावडे यांनी सांगितले की, मनाला शांती केवळ आपले भारतीय शास्त्रीय संगीत देऊ शकते. स्वस्तिकच्या माध्यमातून गोव्यात चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. राजकारणी ‘माजी’ होतात पण कलाकार कधी ‘माजी’ होत नाहीत. स्वस्तिकचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गावकर यांनी मान्यवरांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. गोविंद भगत व हेतल गंगानी यांनी सूत्रसंचालन केले.

मुख्यमंत्र्यांचे हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होणार होते. परंतु ते अन्य कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने उद्‌घाटनास पोचले नाहीत. पण उशिरा का होईना, मुख्यमंत्री आले आणि त्यांनी एमआयटी वर्ल्ड पीसच्या डॉ. प्रीती जोशी यांच्याकडून सत्कार स्वीकारला. स्वराधीश बलवल्ली व साथी कलाकारांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांनी यावेळी ‘स्वरमंगेश’ला शुभेच्छा दिल्या.

मा. दीनानाथांच्या गायकीचा आनंद

स्वराधीश भरत बलवल्ली यांनी उद्‌घाटनानंतर झालेल्या मैफलीत मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचा आनंद दिला. ‘शंकर भंडार बोले..’ या बंदीशीने त्यांनी मैफलीला प्रारंभ केला. त्यानंतर दीनानाथांनी गायिलेली बहारदार पदे विविध हरकतींसह पेश करून बहार आणली. त्यांना दत्तराज सुर्लकर (ऑर्गन), दत्तराज म्हाळशी (संवादिनी), दत्तराज शेट्ये (तबला), किशोर तेली (पखवाज) यांनी साथसंगत केली.

डॉ. प्रीती जोशी-

संगीत हे जीवनाचा भाग आहे. कलेच्या माध्यमातून चांगली माणसे घडवता येतात. गोव्याने कला रत्ने जन्माला घातली आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाचे लिबरल आर्ट स्कूल सुरू करण्याचा, विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कऱ्हाडे यांचा मानस आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT