mumbai high court goa bench Dainik Gomantak
गोवा

Goa Municipal Election: पालिका निवडणुकांचा पेच हायकोर्टात! राज्य सरकारला द्यावा लागणार जाब; निवडणूक न घेता प्रशासक का नेमले? गोवा खंडपीठाचा रोखठोक सवाल

Goa Municipal Elections Delay: म्हापसा, डिचोली, साखळी, वाळपई, पेडणे, फोंडा, मडगाव, केपे, कुंकळ्ळी, सांगे, मुरगाव, कुडचडे-काकोडा, काणकोण पालिका निवडणुकांचा हा विषय आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: ११ पालिका मंडळांची मुदत संपूनही निवडणूक न घेता प्रशासक का नेमले? निवडणूक लांबणीवर पडण्यासाठी वटहुकुमाद्वारे पालिका कायदा दुरुस्ती का केली, याचे उत्तर राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात द्यावे लागणार आहे.

म्हापसा, डिचोली (Bicholim), साखळी, वाळपई, पेडणे, फोंडा, मडगाव, केपे, कुंकळ्ळी, सांगे, मुरगाव, कुडचडे-काकोडा, काणकोण पालिका निवडणुकांचा हा विषय आहे. याआधी प्रभागरचना, आरक्षण हे विषय पालिका प्रशासन खाते हाताळत होते. सरकारने २३ एप्रिल रोजी वटहुकूम जारी करून हे अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. या कामासाठी सहा महिने लागणार असल्याने तोवर निवडणुका घेता येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

...‘यांना’ द्यावे लागणार उत्तर

या विषयाला आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयासमोर आहेत. सरकारने पालिका मंडळांची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणे कायद्याने बंधनकारक असताना तसे न करता प्रशासक नेमले आणि वर निवडणूक लांबवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणूकविषयक कामकाज सोपवले, असे याचिकादारांचे म्हणणे आहे. त्यावर आता १० जून रोजी राज्य सरकार, पालिका प्रशासन खाते आणि राज्य निवडणूक आयोगाला न्यायालयासमोर उत्तर द्यावे लागणार आहे. हा दिवस अंतिम सुनावणीसाठी न्यायालयाने मुक्रर केला आहे.

सरकार जनतेला सामोरे जाण्यास घाबरतेय

सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना याचिकाकर्ते ट्रोजन डिमेलो यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत की, सीमांकन किंवा इतर कोणत्याही तांत्रिक कारणास्तव निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. संविधानाचे हे उघड उल्लंघन आहे. सरकारची कार्यपद्धती आणि भ्रष्टाचार जनतेसमोर उघड होईल, या भीतीने सरकार निवडणुका घेण्यास टाळाटाळ करत आहे. म्हणूनच त्यांनी ऐनवेळी अध्यादेश काढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT