Mungul Gang War Dainik Gomantak
गोवा

Mungul Crime: गोव्याला हादरवून सोडणारे टोळीयुद्ध! 'मुंगूल गँगवॉर' प्रकरणातील सर्व संशयित जामीनमुक्त

Mungul Gangwar: मुंगूल येथे १२ ऑगस्ट रोजी ही गँगवॉरची घटना घडली होती. व्हॅली डिकॉस्टा व वॉल्टर यांच्या गँगच्या संघर्षातून टोळीयुद्ध भडकले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या मुंगूल गँगवॉर प्रकरणातील सर्व २८ ही संशयित आता जामीनमुक्त झाले आहेत.

रसूल शेख, मोहम्मद ताहीर खान, विल्सन कार्व्हालो, मलिक शेख, मंदार प्रभू, सूरज बोरकर, ओमप्रकाश मेघवाल, प्रकाश करबार, सूरज माझी, शाहरुख शेख, इम्रान बेपारी या अकरा जणांना दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला. 

त्‍यांना प्रत्येकी ५० हजारांचा बॉण्‍ड व तेवढ्याच रकमेचे दोन स्थानिक हमीदार, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय राज्याबाहेर न जाणे व अन्य अटी घालण्‍यात आल्‍या आहेत. मुंगूल येथे १२ ऑगस्ट रोजी ही गँगवॉरची घटना घडली होती. व्हॅली डिकॉस्टा व वॉल्टर यांच्या गँगच्या संघर्षातून टोळीयुद्ध भडकले होते.

त्‍यात युवकेश सिंग व रफिक तैशान हे दोघे गंभीर जखमी झाले होते. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्‍‍नोई याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात आढळून आल्याने गूढ वाढले होते. दरम्‍यान, या टोळीयुद्ध प्रकरणात व्हॅली डिकॉस्टा, अमोघ नाईक, अमर कुलाल, वासू कुमार, मोहन अली, ज्योयस्टन फर्नांडिस, सुनील बिलावर, बाशा शेख, गौरांग कोरगावकर, राजेश वेल्मा, प्रकाश वेल्मा,

अविनाश गुंजीकर, धनंजय तलवार, अक्षय तलवार, महेश नाईक, दीपक कट्टीमणी व परशुराम राठोड यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. फातोर्डा पोलिसांनी संशयितांवर तब्बल ६२४ पानाचे आरोपपत्र दाखल केले असून, एकूण ८० साक्षीदारांची यादी जोडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT