Fish Market Dainik Gomantak
गोवा

Goa: मुरगाव नगरपालिकेचे मुख्य मासळी मार्केट बांधण्यासाठी हालचाली सुरु

महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या देव दामोदर ट्रस्टच्या (Dev Damodar Trust) जागेत बांधलेल्या शेडमध्ये पुढील महिन्यात स्थलांतर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को (Vasco) येथील मुरगाव नगरपालिकेचे (Murgaon Municipality) मुख्य मासळी मार्केट बांधण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. यासाठी मासळी विक्रेत्यांना तात्पुरते राज्य महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या देव दामोदर ट्रस्टच्या (Dev Damodar Trust) जागेत बांधलेल्या शेडमध्ये पुढील महिन्यात स्थलांतर करण्यात येणार आहे. पूर्वीच्या मासळी मार्केटच्या जागी राज्य नगरविकास संस्था(सुडा) सर्व सोयी सुविधा नियुक्त उपलब्ध अशी इमारत बांधण्यात येईल.

वास्कोत सुसज्ज असे मासळी मार्केट व्हावे यासाठी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, मुरगाव नगरपालिके तर्फे खूप परिश्रम घेण्यात आले. यासाठी पूर्वीच्या मासळी मार्केट मधील मासे विक्रेत्या बरोबर बैठका घेऊन ,त्यांना पूर्ण सोयी सुविधा नियुक्त उपलब्ध मार्केट बांधून देण्याचे बैठकीत वारंवार सांगण्यात आले होते. अखेर वास्को मासळी मार्केट व्यवस्थापन व मुरगाव नगरपालिका यांच्यात समझोता झाल्यानंतर नवीन मासळी मार्केट बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. यासाठी सर्वप्रथम पूर्वीच्या मासळी मार्केट विक्रेत्यांना स्थलांतर करणे महत्त्वाचे असल्याने, अखेर त्यांना वास्को शहरातील राज्य महसूल विभागाच्या ताब्यात असलेली देव दामोदर ट्रस्टच्या जागेत तात्पुरती मासळी मार्केटची शेड उभारून दिलेली आहे. पुढील महिन्यात शहरातील मासळी विक्रेते मुरगाव नगरपालिकेतर्फे तात्पुरते उभारलेल्या शेड मध्ये मासे विक्री करून आपला व्यवसाय करणार आहे.

वास्को शहरात सर्व सुविधा नियुक्त असलेले मासळी मार्केट राज्य विकास संस्था(सुडा) अंतर्गत बांधण्यात येणार आहे .वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा,माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांच्या प्रयत्नामुळे वास्को वासियांना अनेक वर्षापासून दुरावलेले मासळी मार्केट स्वप्न पूर्ण होणार आहे. तर पूर्वीच्या मासळी मार्केटच्या जागेच्या मातीची चाचणी पूर्वीच केल्याने आता फक्त मुरगाव नगरपालिकेतर्फे औपचारिकता तेवढी शिल्लक आहे .वास्को सुडातर्फे मुरगाव नगरपालिकेचे नूतनीकणाचे काम सुरू असून आता लवकरच मासळी मार्केटच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान मासळी मार्केटमध्ये सर्व ठिकाणी पेवर्स बसविण्याबरोबर विजेचे काम सुडाच्या कंत्राटदारा मार्फत हातात घेण्यात आले आहे. .दुचाकी चारचाकी वाहने या मार्केटमध्ये आल्यास त्याची पार्किंग सुविधा उपलब्ध केलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT