Goa-Moscow Flight Dainik Gomantak
गोवा

Goa-Moscow Flight: गुडन्यूज! मॉस्कोहून पहिले चार्टर विमान ‘दाबोळी’त दाखल

Goa-Moscow Flight: 255 रशियन पाहुण्यांचे पर्यटन विभागाकडून उत्साहात स्वागत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa-Moscow Flight या पर्यटन हंगामातील पहिले रशियन चार्टर विमान मॉस्कोहून गोव्यात आज (रविवारी) पहाटे ५.३० वाजता दाबोळी विमानतळावर २५५ पर्यटकांना घेऊन उतरले. महिन्याभरात अाणखी २५ चार्टर विमाने दाखल होतील, अशीही माहिती मिळाली आहे.

सागरी पर्यटन हंगामाला २२ सप्टेंबरला सुरवात झाल्यानंतर २०२३-२४ या हंगामातील पहिले रशियन चार्टर विमान आज दाखल झाले. पर्यटकांनी दाबोळी विमानतळावर पाय ठेवताच पर्यटन खात्यातर्फे त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

रशिया सरकारच्या ‘एरोफ्लॉट’ या विमान कंपनीने शनिवारपासून मॉस्को आणि एकटेरिनबर्ग येथून गोव्यासाठी थेट उड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चालविली जाईल, असे ''एरोफ्लॉट''ने म्हटले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनावरही त्याचा परिणाम झाला आहे. रशियन पर्यटक मोठ्या प्रमाणात खर्च करतात.

त्याचा लाभ किनारी भागातील व्यावसायिकांना होत होता. पण आता ती स्थिती राहिलेली नाही. किनारी भागातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, गेस्ट हाऊसवर नजर टाकली तर देशी पर्यटकांची संख्याच मोठ्या प्रमाणात दिसून येते.

मॉस्कोहून दिल्लीलाही उड्डाण

गोव्याव्यतिरिक्त रशियातून मॉस्को ते दिल्ली थेट उड्डाणे देखील सुरू करण्यात येणार आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार, ३० सप्टेंबरपासून शेरेमेत्येवो विमानतळावरून तीन साप्ताहिक उड्डाणे मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी वाईड-बॉडी एअरबस ए-३३० चालवली जातील. एरोफ्लोट एसयू२३६ फ्लाईट सुमारे २५५ प्रवाशांसह आज पहाटे दाबोळी विमानतळावर पोहोचले.

वेडिंग डेस्टिनेशन’ पुरस्कार

दिल्ली येथील एका हॉटेलमध्ये पर्यटनावर आधारित ‘बीएलटीएम’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात गोवा पर्यटन विभागाला ‘मोस्ट एक्सक्ल्यूझिव्ह वेडिंग डेस्टिनेशन’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

फेअर फेस्ट मीडियाचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अग्रवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे जनरल मॅनेजर मार्केटिंग गेविन डायस आणि इतर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT