Calangute Crime: कळंगुटमध्ये थरार! अंगावर कार चढवत पोलीस हवालदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न

Calangute Crime: पर्यटकांची अरेरावी : जखमीवर उपचार सुरू
Calangute Police
Calangute PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Crime: गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी आलेल्या संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या ऑन ड्युटीवरील पोलिसाच्या अंगावर थेट कार चढवून जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

यात कर्तव्यावर असलेले कळंगुट पोलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर हे गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी पोलिसांनी संदीप कुमार एम. (वय 26, रा. बंगळूर, मूळ आंध्र प्रदेश) आणि वसंत मडिवाल (वय 32, कारवार) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

ही थरारक घटना 29 सप्टेंबर रोजी रात्री ११.३०च्या सुमारास गौरावाडा, कळंगुट येथील मेरिएट हॉटेलजवळ घडली. गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी दोघेजण कळंगुटमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिस पथक गौरावाडा येथे गेले असता, दोघेही संशयित केए-०४-एनबी-८३९१ या क्रमांकाच्या कारने प्रवास करत होते.

या दुर्घटनेत आमोणकर यांच्या डोक्याला व कंबरेला गंभीर जखम झाली. पोलिसांनी आमोणकरांना गोमेकॉत हलविले. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कळंगुटचे प्रभारी निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजाराम बागकर हे पुढील तपास करत आहेत.

पलायनाचा प्रयत्न फसला

घटनास्थळावरून पलायन करण्याच्या स्थितीत असलेल्या वसंत मडिवाल याला पोलिसांनी लगेच पकडले.

तर कार घेऊन पसार झालेल्या संदीपकुमारची माहिती पोलिस कंट्रोल रुमसह इतर स्थानकांना देण्यात आली.

शनिवारी फोंडा पोलिसांनी संदीपकुमारला कारसह धारबांदोडा येथे पकडले. तो अनमोडमार्गे बंगळुरूला पळून जाण्याच्या बेतात होतात.

100 मीटरपर्यंत नेले फरपटत

पोलिस कारजवळ येताच चालकाशेजारी बसलेला मडिवाल याने दरवाजा उघडून पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, आमोणकरांनी त्याला पकडले.

साथीदारास पकडल्याचे पाहून संदीपकुमार याने गाडी मागे घेऊन ती आमोणकर यांच्या अंगावर चढवली.

आमोणकर कारखाली सापडले. याच स्थितीत संशयिताने आमोणकरांना सुमारे 100 मीटरपर्यंत फरफटत नेले.

Calangute Police
Goa Monsoon 2023: वादळसदृश्य कमी दाबाचा पट्टा सोलापूरकडे सरकला; धोका टळला, पण जनजीवन विस्कळीत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com