Goa: मुरगाव नगरपालिकेतर्फे (Mormugoa Municipality) देस्तेरो उड्डाणपुलाखालील (Destero Flyover) नव्याने बांधलेल्या काही घरमालकांना घरे पाडण्याचा आदेश जारी केला आहे (Orders to demolish houses). याविरुद्ध येथील घर मालकांनी पणजी प्रशासन लवादाकडून स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मुंरगाव आयओसी उड्डाणपुलाखालील पूर्वीची घरे पाडून नव्याने बांधलेल्या घरांना मुरगाव नगरपालिकेतर्फे नोटीस बजावून घरे पाडण्याचा आदेश जारी केला होता. सदर बांधकाम बेकायदेशीर (Illegal Construction) असल्याची तक्रार १३ तक्रारदारांनी मुरगाव नगरपालिकेत दाखल केली होती. यात तीन राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तक्रार दाखल केली आहे.
मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यासमोर येथील नव्याने उभारलेल्या घरमालकांची अनेकवेळा सुनावणी झाल्यानंतर अखेर पालिकेने नव्याने उभारलेल्या घरांना पाडण्याचे आदेश जारी केले. येथील घरमालकांना पाडण्याचे आदेश जारी होताच त्यांनी याविरुद्ध पणजी येथील प्रशासन लवादाकडे दाद मागण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार येथील घरमालक प्रशासन लवादाकडे स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.