Coal Handling At Mormugao Port Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port: नियंत्रण मंडळाचेच वाहतूकदारांना अभय, पोलिस तक्रारीचा निर्णय बरेच महिने प्रलंबित

Coal Handling At Mormugao Port: कारवाईत चालढकल: जनतेत संताप

गोमन्तक डिजिटल टीम

Coal Handling At Mormugao Port: मुरगाव बंदरात हाताळल्या जाणाऱ्या आणि रेल्वेतून वाहून नेल्या जाणाऱ्या कोळशाबाबत राज्यभरातील जनतेत संताप आहे.

असे असतानाही प्रदूषणकर्त्यांविरोधात कडक कारवाईची जबाबदारी असलेल्या गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मर्यादेबाहेर कोळसा हाताळणी करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी अक्षम्य अशी चालढकल केली जात असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसात तक्रार देण्याचे अधिकार मंडळाच्या सदस्य सचिवांना देण्यासाठीचा निर्णय मंडळाने गेले काही महिने प्रलंबित ठेवला आहे. या महिन्यात होणाऱ्या मंडळाच्या बैठकीच्या विषय सूचीवरही तो विषय घेतलेला नाही.

मुरगाव बंदरात जेएसडब्ल्यू कंपनीकडून कोळसा हाताळणी करण्यात येते. मुरगाव बंदर प्राधिकरणाकडून कोळसा हाताळणीबाबत मंडळाला माहिती देण्यात येते. त्या माहितीत त्या कंपनीकडून मंजूर मर्यादेपेक्षा जास्त कोळसा हाताळणी केल्याचे नमूद करण्यात आले होते.

मंडळाने याप्रकरणी कंपनी आणि एमपीटी विरोधात पोलिसात तक्रार केली. मंडळाच्या सदस्य सचिवांना पोलिसात तक्रार करण्याचा अधिकार देण्यात आला नाही असा दावा करून कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली.

त्यानंतर झालेल्या अनेक सुनावण्यांनंतर ती तक्रार करण्यासाठी सदस्य सचिवांना पुरेसे अधिकार मंडळाने दिले नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि तक्रार रद्द केली.

हा विषय आता संपला आहे. केंद्र सरकारच आता अनियमितपणाबाबत फौजदारी कारवाई नको अशी भूमिका घेत आहे. व्यवसाय सुलभतेवर सरकारचा भर आहे. पाच वर्षांपूर्वीचा हा विषय आता का उरकला जावा. त्यावेळी चुकीच्या व्यक्तीवर पोलिस तक्रार केली होती. त्यामुळे कारवाई न्यायालयात टिकली नाही.
डॉ. महेश पाटील, अध्यक्ष गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळ

मंडळ प्रदूषणकर्त्यांना पाठीशी घालते का?

जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात पोलिसात तक्रार करण्यासाठी सदस्य सचिवांना पुरेसे अधिकार देणारा ठराव मंडळाने मंजूर करणे आवश्यक आहे. म्हणजे आताचे सदस्य सचिव तशी तक्रार पोलिसात करू शकतील.

असे अधिकार देऊन तक्रार करावी, असे मत मंडळाच्या कायदा अधिकाऱ्यानेही व्यक्त केले आहे. तरीही मंडळाने त्यावर निर्णय घेणे प्रलंबित ठेवले आहे. त्यामुळे मंडळ कोळसा हाताळणी करून प्रदूषण करणाऱ्यांना पाठीशी घालते की काय अशी शंका घेण्यास जागा निर्माण झाली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT