Laxmikant Parsekar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Festival: प्रकाशाकडे वाटचाल करा -लक्ष्मीकांत पार्सेकर

Goa Festival: दीपदान उत्साहात : मधलावाडा-पार्सेत नौकानयन स्पर्धा

दैनिक गोमन्तक

Goa Festival: जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करणे, हेच खरे प्रकाश पर्व आहे. अंधार नाहीसा करण्यासाठी अंतरंग स्वच्छ व शुद्ध असावे लागते. प्रकाश हे एक तत्व आहे व हे तत्व आत्मसात करावे, असे मत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले.

श्री महागणपती कला व सांस्कृतिक संस्था हरिहरेश्वर मंदिर मधलावाडा, पार्से येथे आयोजित कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त नौकानयन स्पर्धा व दीपदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने पार्सेकर बोलत होते.

व्यासपीठावर पार्से ग्रामपंचायतीचे सरपंच अजय कळंगुटकर, कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य सुदन बर्वे, खास निमंत्रित नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, ज्येष्ठ कलाकार गणपत कळंगुटकर, श्री भगवती देवस्थानचे अध्यक्ष साबासाहेब देसाई,माजी सरपंच गुरुदास पांडे, संस्थेचे अध्यक्ष बाबलो आजगावकर आदी उपस्थित होते.

कृष्णा पालयेकर म्हणाले, कलाकारांसाठी या बोटी प्रेरणास्त्रोत आहेत. विविध रंग आणि आकाराच्या बोटी बनवून कलाकार आपली कला प्रदर्शित करतात. सुदन बर्वे म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमा हा उत्सव भारतात आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा संबोधले आहे. त्रिपुरासूराचा वध केल्याचा आनंद दिवे लावून व प्रज्वलित दीप नदीच्या पाण्यात सोडून (दीपदान) व्यक्त केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT