Mopa International Airport | Goa News Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: पर्रीकर की बांदोडकर? मोपा नामांतराचा मुद्दा चिघळणार

Mopa Airport: माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांची विमानतळाला जॅक सिक्वेरा यांचे नाव द्यावे.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: पेडणे तालुक्यातील जीएमआर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा आता चिघळणार, अशी शक्यता आहे. विमानतळाला पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे अशी मगोपसह अनेकांची मागणी आहे.

दुसरीकडे भाजपमधील एका गट दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नावासाठी आग्रही आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी उडी घेतली असून विमानतळाला जॅक सिक्वेरा यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे.

डिसेंबरमध्ये विमानतळाचे उद्‍घाटन होऊन जानेवारी 2023 मध्ये येथून देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर विमानांची ये-जा सुरू होणार आहे. या दुसरीकडे विमानतळाला कुणाचे नाव द्यायचे? हा मुद्दा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सुरवातीला पेडणे तालुक्यातील काही संघटनांनी या विमानतळाला बांदोडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली.

त्यानंतर मगो पक्षाने आपल्या केंद्रीय कमिटीची बैठक घेत या विमानतळाला बांदोडकरांचे नाव द्यावे असा ठराव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेकांना पत्रे धाडली आहेत.

ढवळीकर म्हणतात, भाऊंचेच नाव द्या

भाऊसाहेबांनी शिक्षण, आरोग्य, साधन सुविधा, कृषी, कला संस्कृती, भाषा यासारख्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्यामुळे आजचा गोवा उभा राहिला आहे. ‘मोपा’ला त्यांचेच नाव उचित आहे.

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

चर्चिलच्या मते जॅक सिक्वेरांचे नाव हवे

पहिले विरोधी पक्षनेते जॅक सिक्वेरा यांच्यामुळे ओपिनियन पोल झाला. आणि त्यामुळेच गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राहिले. अन्यथा, गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता. म्हणून त्यांचे नाव विमानतळाला द्यावे.

- चर्चिल आलेमाव, माजी मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT