मयेत भात कापणी, मळणीची कामे पूर्णत्वाकडे Dainik Gomantak
गोवा

पावसाने विश्रंती घेतल्याने, भातपीक शेतकऱ्यांना दिलासा

पावसाची (Rain) कृपा अशीच राहिल्यास येत्या दोन दिवसात शेतीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: तालुक्यातील बहूतेक सर्व भागात भातकापणी आणि मळणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. काही भागात ही कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या चार दिवसांपासून पावसानेही कृपा केल्याने कापणी आणि मळणीच्या कामात अजूनतरी व्यत्यय आलेला नाही.

पावसाची (Rain) कृपा अशीच राहिल्यास येत्या दोन दिवसात शेतीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऐन पिकाच्यावेळी यंदा परतीच्या पावसाने कहर केला असला, तरी यंदा भातपिक समाधानकारक असल्याचा दावा कृषी खात्याने (Department of Agriculture) व्यक्त केला आहे.

मयेत कामे अंतिम टप्प्यात

मये भागात सध्या भातकापणी आणि मळणीची कामे जोरात सुरु आहेत. हळदणवाडी-मये येथे यंत्राद्वारे भातकापणी आणि मळणीच्या कामाचा आमदार(MLA) प्रवीण झाट्ये यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मयेची सरपंच स्मिता आरोंदेकर, उपसरपंच कृष्णा परब, पंच विश्वास चोडणकर, तुळशीदास चोडणकर आणि उर्वी मसूरकर, वासू गावकर आदी उपस्थित होते. कृषी क्षेत्रात आधुनिकतेचा शिरकाव झाल्यापासून क्वचित ठिकाणी वगळता बहूतेक भागात यंत्राद्वारे भाताची कापणी आणि मळणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मये भागातही यंत्राद्वारे भातकापणी आणि मळणीची कामे करण्यात येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT