Monsoon Vegetable  Dainik Gomantak
गोवा

Bicholim: रानभाज्यांनी फुलला बाजार; डिचोली परिसरात तायकिळा-तेरेही उपलब्ध, 20 ते 50 रुपये वाटा

Goa Monsoon Vegetable Market: पावसाळ्यात रानावनात उगवणाऱ्या नैसर्गिक पावसाळी पालेभाज्या बाजारात विक्रीस उपलब्ध होऊ लागल्या आहेत. पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्यांचे दरही परवडण्यासारखे आहेत.

Sameer Amunekar

डिचोली: आहारातील एक प्रमुख घटक म्हणजे भाज्या. राज्याबाहेरील भाज्यांसह स्थानिक मळ्यात वा ‘पोरसू’त पिकणाऱ्या भाज्या बाजारात उपलब्ध होत असतानाच, आता पावसाळ्यात रानावनात उगवणाऱ्या नैसर्गिक पावसाळी पालेभाज्या बाजारात विक्रीस उपलब्ध होऊ लागल्या आहेत. पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्यांचे दरही परवडण्यासारखे आहेत. २० ते ५० रुपये वाटा. याप्रमाणे या पावसाळी भाज्या बाजारात विक्रीस उपलब्ध होत आहेत.

औषधी गुणधर्म आणि पोषकसमृद्ध जीवनसत्त्व असणाऱ्या पावसाळी भाज्या आरोग्याच्यादृष्टीने उत्तम असतात. त्यामुळे राज्याबाहेरील भाज्यांच्या तुलनेत डिचोली बाजारात सध्या या पावसाळी भाज्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. रानात पिकणाऱ्या फळभाज्यांही बाजारात उपलब्ध होत असल्या, तरी पालेभाज्यांच्या तुलनेत अजूनतरी त्यांचे प्रमाण कमी आहे.

सध्या तायकुळा, कुड्डूक, अळू (तेरे), आकूर आदी पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या बाजारात विक्रीस उपलब्ध होत आहेत. ग्रामीण भागात या भाज्या सहज उपलब्ध होत असतात. बहूतेक भागात रानावनात फिरून गृहिणी या भाज्या कुटताना दिसून येतात. मात्र शहरातील जनतेला जवळपास या पावसाळी भाज्या मिळणे दुरापास्त होत असतात. त्यामुळे पावसाळी भाज्यांना शहरातील ग्राहकांकडून अधिक मागणी असते.

रान भाज्यातून पोषकसमृद्ध आणि जीवनसत्व असल्याने या भाज्या आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्त असतात. अन्य भाज्यांच्या तुलनेत पावसाळी भाज्यांचे दर परवडणारे असतात. मोसमात प्रत्येकजण या पावसाळी भाज्यांचा स्वाद घेतल्याशिवाय राहत नाहीत. - सूर्यकांत देसाई, निवृत्त अधिकारी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: साळगाव दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर

Goa Politics: सरकार गोवेकरांचे की दिल्लीकरांचे? आमदार वीरेश यांचा सवाल, 'सडेतोड नायक'मध्ये मांडली भूमिका

WCL 2025: टीम इंडिया 2025च्या WCL मधून बाहेर, पाकिस्तानची थेट 'फायनल'मध्ये एन्ट्री

Ro-Ro Ferry In Goa: गाजावाजा करत सुरू केलेली 'रो-रो फेरीबोट' सेवा 15 दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर, प्रवाशांना नाहक मन:स्ताप

Goa School: पाणी पिण्‍यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार चार मिनिटांचा 'ब्रेक', शिक्षण खात्‍याकडून परिपत्रक जारी

SCROLL FOR NEXT