Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Updates: तीन दिवस ऑरेंज अलर्ट; मच्छीमारांना इशारा

विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस कोसळण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) काही ठिकाणी आज मुसळधार पाऊस झाला. आज सोमवारपासूनही राज्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस कोसळण्याची (Goa Monsoon Updates) शक्यता गोवा वेधशाळेने (IMD Goa) वर्तविली आहे. त्यामुळे सोमवारपासून सलग तीन दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जाहीर करण्यात आला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती निवारण आणि अग्निशमन दलाला सजगतेचे आदेश देण्यात आले आहेत.

सोमवारपासून बुधवारपर्यंत राज्यातील मच्छीमारांनाही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. काल रात्री पैंगीण भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊन पैंगीण-गालजीबाग रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला, तर वास्को येथे एक वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने कोकण किनारट्टीत अतिवृष्टीची शक्यता आहे. आज रविवारीदेखील राज्यात ‘यलो अलर्ट’ होता. पहाटे राज्याच्या काही भागांना पावसाने झोडपले. त्यानंतर दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. राज्यात 1.5 इंच पावसाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 106.1 इंच पाऊस झाला असला तरी सरासरी गाठता आलेली नाही. मात्र, येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सरासरीहून अधिक पाऊस होईल, असे अनुमान आहे.

सतर्कतेचे आदेश

सोमवारपासून राज्यात होणाऱ्या अतिवृष्टीदरम्यान घाट क्षेत्रात दरड कोसळण्याबरोबरच सखल भागात पाणी साचून झाडे उन्मळून पडण्यासह शेतीच्या नुकसानीची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच अनुचित घटना घडल्यास तात्काळ दक्षता विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्रात ताशी 40 ते 50 कि. मी. वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही वेधशाळेने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

Ironman 70.3 Goa India: गोव्यात रविवारी रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार; 31 देशातील 1,300 स्पर्धक घेणार सहभाग

Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

विषारी इंजेक्शन देऊन 10 जणांची केली हत्या, 27 जणांना मारण्याचा केला प्रयत्न, 'सीरिअल किलर' नर्सला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

Ahmedabad Plane Crash: मुलाची चूक नाही, तुम्ही ओझं घेऊ नका! न्यायालयाने पायलटच्या 91 वर्षीय वडिलांची काढली समजूत, केंद्राला बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT