Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पेडण्यात सर्वाधिक पावसाची नोंद

गोवा राज्यात (Goa) अनेक भागांमध्ये अधुनमधून पावसाचा(Rain) जोर होता तर काही ठिकाणी रिपरिप सुरू होती. येत्या पुढील दिवसात पावसाचा जोर कमी असणार आहे.

Dainik Gomantak

पणजी: गोवा राज्यात (Goa) अनेक भागांमध्ये अधुनमधून पावसाचा(Rain) जोर होता तर काही ठिकाणी रिपरिप सुरू होती. येत्या पुढील दिवसात पावसाचा जोर कमी असेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना होड्या घेऊन समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. आज पेडण्यामध्ये पावसाचा जोर अधिक होता व राजधानी पणजीत अधुनमधून जोरदार पाऊस पडल्याने लोकांची धांदल उडाली.

अरबी समुद्रातील परिसरात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याने त्याचा परिणाम राज्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या गोवा विभागाने वर्तविली आहे. आज दिवसभरात पेडणे - 7 सें.मी., सांगे - 4 सें.मी., म्हापसा, पणजी व मडगाव प्रत्येकी 3 सें. मी. तसेच जुने गोवे, साखळी, केपे येथे प्रत्येकी 2 सें. मी. तर काणकोण, वाळपई, दाबोळी येथे प्रत्येकी 1 सें. मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पेडणे, वाळपई व केपे या तीन भागांत 1 हजार मिमी. पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. राज्यात उद्या सर्वसाधारण कमी - जास्त पावसाची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT