Goa: आगर वाडा चोपडे पंचायत सभागृहात लसीकरण केंद्राला सुरुवात

कोविड लसीकरण मोहीमेत एकूण १९१ जणांनी लाभ घेतला.१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचा यात समावेश होता.यात काही जणांना पहिला तर काहींना दुसरा डोस देण्यात आला.
आगर वाडा चोपडे पंचायत येथे लसीकरण करताना
आगर वाडा चोपडे पंचायत येथे लसीकरण करतानाDainik Gomantak

मोरजी : सामुदायिक आरोग्य केंद्रातर्फे (health center) आगरवाडा चोपडे (Agarwada Chopde) पंचायत सभागृहात शुक्रवारी आयोजित केलेल्या कोविड लसीकरण (Covid vaccination) मोहीमेत एकूण १९१ जणांनी लाभ घेतला.१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचा यात समावेश होता.यात काही जणांना पहिला तर काहींना दुसरा डोस देण्यात आला. तूये सामुदायिक आरोग्य केंद्राच्या डॉ.मानसी आळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रदर विजय गवस ,सिस्टर अलीशा कलांगुटकर,सिस्टर रंजीता शेट गावकर ,समीर महाले,मिथुन इब्रामपुरकर,महेश कालोजी,राजाराम मठकर,दर्शना नारोजी,जयराम सावंत यांनी भाग घेतला.

आगरवाडा चोपडे पंचायत तीच्या वतीने या मोहिमे साठी सर्व सहकार्य करण्यात आले. शनिवार २६ रोजी सकाळी ९ ते ४ दरम्यान याच ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असून इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com