Tree Uprooted | Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Tree Uprooted: पणजीतील मुख्य रस्त्यावर कोसळले झाड; पहाटेची घटना

राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, जागोजागी पडझड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे

दैनिक गोमन्तक

राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, जागोजागी पडझड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात पडझडीच्या घटनांचे प्रमाण जास्त असते, मात्र सध्या शहरी भागातही झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. पणजीतील जिमखान्याजवळील मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरील पणजी जिमखान्यासमोरील भला मोठा जुना वृक्ष मध्यरात्री मुख्य रस्त्यावर कोसळला. अग्निशामक दलाने रस्त्यावरील झाडाच्या फांद्या कापून वाहतूक खुली केली.

झाडाचा उर्वरित भाग महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी सकाळपासून हटविण्यास सुरुवात केली आहे. सुदैवाने यावेळी रस्त्यावर वाहतूक तुरळक असल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पारोडा केपे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे मडगाव - केपे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मार्ग वाहतुकीसाठी आणि नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT