Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: वादळसदृश्य कमी दाबाचा पट्टा सोलापूरकडे सरकला; धोका टळला, पण जनजीवन विस्कळीत

Goa Monsoon 2023: वादळ सोलापूरकडे : कोकण रेल्वे ठप्प

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023 मध्य अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ आणि कमी दाबाचा पट्टा प्रवाहीत होऊन अखेर प्रभावहीन बनला आहे. दक्षिण कोकण किनारपट्टीजवळील वादळसदृश्य कमी दाबाचा पट्टा सोलापूरकडे सरकल्याने राज्यावरचा धोका टळला.

मात्र, पनवेलजवळ मालवाहतूक रेल्वे रूळावरून घसरल्याने आज 12 रेल्वेगाड्या रद्द झाल्या. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवासी खोळंबले होते. त्यांचे अतोनात हाल झाले.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणातील कमी दाबाचा पट्टा गोव्यापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरकला आहे. त्यामुळे गोव्यासाठीचा रेड अलर्ट आता ऑरेंज वॉर्निंगमध्ये रूपांतरित केला आहे.

रत्नागिरी आणि गोवा दरम्यानच्या समुद्रातून कोल्हापूर-सोलापूरच्या दिशेने वाहत असलेल्या या दबावाचा परिणाम म्हणून शनिवारी गोव्यात जोरदार पाऊस झाला.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी दरड कोसळणे, घराच्या भिंती कोसळणे, रस्त्यावर पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे अशा घटना घडल्या आहेत.

२४ तासांत ५९ मिलीमीटर बरसला

राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे घरांच्या पडझडीबरोबरच अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचले. याचा परिणाम वाहतुकीवर झाला. अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती.

रेल्वेसेवा विस्कळीत; विमाने विलंबाने

कोकण किनारपट्टीत पडणाऱ्या संततधार पावसामुळे कोकण रेल्वेचा वेग आधीच कमी झालेला असताना पनवेलजवळ मालवाहतूक रेल्वे रूळावरून घसरल्याने आज मांडवीसह गोव्याकडे येणाऱ्या आणि गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.

याबरोबरच पश्चिम किनारपट्टीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विमान सेवाही काहीशी विस्कळीत झाली असून सकाळच्या सत्रात काही विमाने उशिरा ये-जा करत होती, अशी माहिती विमान प्राधिकरणाने दिली.

मालगाडीचे पाच डबे पनवेलमध्ये घसरले

कोकण रेल्वे मार्गावर घसलेले मालगाडीचे डबे आणि हार्बर मार्गावर 38 तासांचा मेगाब्लॉक यामुळे आज प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रेल्वेकडून गाड्यांबाबत वेळीच माहितीही दिली गेली नाही.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांत प्रवासी अन्नपाण्यशिवाय अडकून पडले. अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबविल्याने आणि बेलापूरकडे जाण्यासाठी एकही लोकल नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीने प्रवास करावा लागला.

कोठे काय घडले?

  • धारगळ येथे दरड कोसळली. त्‍यामुळे काहीकाळ वाहतुकीवर परिणाम झाला.

  • माडेल-चोडण येथे फेरीबोट धक्‍क्‍यानजीक सकाळी रस्‍त्‍यावर आले पाणी.

  • चिंचणी येथील जुनी व जीर्ण झालेल्‍या इमारतीचा भाग अचानक कोसळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT