Dr.Rameshkumar Gomantak Digital Team
गोवा

Goa Monsoon Predication 2023 : यंदा राज्यात कोसळणार मुबलक पाऊस

सडेतोड नायक : डॉ. रमेशकुमार यांची माहिती; पावसाचा बदलता पॅटर्न चिंताजनक

गोमन्तक डिजिटल टीम

Sadetod Nayak : मॉन्सूनची प्रगती ही विविध घटकांवर आधारलेली असते. केवळ पाऊस पडणे म्हणजे मॉन्सून आला, असे होत नाही. यंदा राज्यात पाऊस येण्यास आठवड्यभराचा उशीर होणार असला तरी राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस कोसळेल, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे (एनआयओ) निवृत्त वैज्ञानिक डॉ. एम. आर. रमेशकुमार यांनी सांगितले. ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

यंदा मॉन्सूनवर काही प्रमाणात एल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. परंतु अशाच प्रकारे एल निनोचा अडथळा 1997 साली झाला होता. परंतु त्यावर्षी देखील मुबलक प्रमाणात पाऊस झाली होता. यंदा 94 ते 96 टक्के पावसाची शक्यता असून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कशा पद्धतीने पावसाची वाटचाल असेल, यावर सर्वकाही अवलंबून राहील, असे डॉ. रमेशकुमार यांनी सांगितले.

पाणी संवर्धन करणे काळाची गरज

राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडतो. परंतु उन्हाळ्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्या उद्भवताना आपण पाहतो. आपण आताच योग्य त्या उपाययोजना करत पावसाचे पाणी जमिनीत जिरविले पाहिजे. विहिरी, तळे, आपल्या इमारतीवर येणारे पाणी अडवून जमिनीत जिरवायला हवे. अन्यथा येत्या काळात राज्यात पाण्याची बिकट अवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या संसाधनांचा योग्य वापर करणे काळाची गरज असल्याचे मत रमेशकुमार यांनी व्यक्त केले.

आता पूर्वीप्रमाणे समांतर पद्धतीने बरसणारा पाऊस राहिलेला नाही. पावसाचा बदललेला पॅटर्न अतिशय चिंतेची बाब आहे. एकच दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे, नंतर काही दिवस पाऊसच न पडणे, याचा परिणाम शेती, नगर नियोजन, आदी बाबींवर दिसून येत आहे. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने जनजीवन देखील विस्कळीत होऊन पूर येणे, आदी घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे आता राज्यातील सरकारी यंत्रणांनी देखील याबाबत योग्य ती पावले उचलावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

SCROLL FOR NEXT