Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: गणेशोत्सव काळात पावसाची हजेरी, पुढील काही दिवस राज्यात 'यलो' अलर्ट जारी

वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजावरून यंदा बाजारावर पावसाचे सावट राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

Ganeshprasad Gogate

Goa Monsoon 2023: गेल्या काही आठवड्यात राज्याच्या पावसाने उघडीप दिल्यानंतर मागील काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसू लागल्या होत्या.

त्यातच आता गोवा वेधशाळेने पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे दर्शवत पुढील काही दिवस गोव्यासह लगतच्या कोकणासाठी 'यलो अलर्ट' जारी केला.

16 आणि 17 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीय वारे निर्माण झाल्याने 15 सप्टेंबरपासून पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तविली असून यलो अलर्ट जारी केला आहे.

अरबी समुद्रात ताशी 55 ते 75 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे घोंघावणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश करू नये, असे आवाहन केले आहे. मागील 24 तासांत राज्यात 5 मि.मी. पाऊस पडला.

राज्यात आतापर्यंत एकूण 2,872 मि.मी. पाऊस पडला असून सरासरी पावसाच्या तुलनेत 0.7 टक्के अधिक पाऊस पडला आहे. गुरुवारी पणजी येथे कमाल 31.5, तर किमान 24.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

गोव्यात गणेश चतुर्थीच्या तयारीला वेग आला असून रंगरंगोटीच्या सामानासह फुले, फळे, भाजीपाला यांच्या बाजारपेठांत नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केलीय.

मात्र वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजावरून यंदा बाजारावर पावसाचे सावट राहण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे.

दरम्यान गोव्यात माटोळीचा बाजाराला सुरुवात झाली असून नारळ, केळी, पपई, सफरचंद, सुपारीची पेंड या सामानासह अन्य पूजेचे साहित्य खरेदी करण्यास लोकांची गर्दी बाजारात दिसू लागली आहे. मात्र सणासुदीच्या काळात बरसणाऱ्या या पावसामुळे लोकांच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT