Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: मांद्रेत 400 वर्षांचे पिंपळाचे झाड कोसळले

वारे वेगाने वाहत असल्याने राज्यभर मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Monsoon 2023 राज्याला मागील काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील दोन दिवसात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी पडझडीच्या घटना मात्र सुरूच आहेत.

मुसळधार पावसामुळे काल म्हणजेच शनिवारी चार ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या असून आज रविवारी देखील झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

मांद्रे सावंतवाडा येथे 400 वर्ष जुने पिंपळाचे झाड एका घरावर कोसळले असल्याचे वृत्त हाती येतेय. या घटनेत घराचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले असले तरी यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी हरवळे गावात अवघ्या पाच मिनिटांत सर्वत्र जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळली. या झाडांबरोबरच वीजखांब आणि विद्युत वाहिन्याही रस्त्यावर तुटून पडल्याची घटना घडली होती.

मॉन्सून वारे वेगाने वाहत असल्याने राज्यभर मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. झाडे कोसळल्यामुळे अनेक भागांत विजेचाही खेळखंडोबा झाला आहे. सत्तरी, पेडणे, तसेच राज्यातील काही भागांत विजेचा लपंडाव सुरूच आहे.

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पडझडीच्या घटनांत वाढ झाली आहे. मुरगाव, काणकोण, फोंडा, तिसवाडी आणि सासष्टी या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे घरे, वीजखांब, ट्रान्सफॉर्मर, वाहने, दरड कोसळणे, रस्ता खचणे, अशा विविध घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT