Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023 : सत्तरीत पडझड सुरूच; लाखोंची हानी !

नद्यांच्या पातळीत वाढ : ‘अग्निशमन’ वाहनावरच पडली संरक्षक भिंत; वीज खंडित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023 : सत्तरी तालुक्याला बुधवारी दिवसभर मुसळधार पावसाने व वाऱ्याने झोपडले. संततधार पावसामुळे विविध ठिकाणी झाडांची पडझड व घरांची भिंत कोसळून लाखोंचे नुकसान झाले. आज पहाटे वाळपई मामलेदार कार्यालयाची संरक्षक भिंत पार्क केलेल्या वाळपई अग्निशमन दलाच्या वाहनावर भिंत कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. उर्वरित भिंतही कोसळण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान, नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार सालेली येथे मंगळवारी उशिरा रात्री अर्जुन चंद्रू गावकर यांच्या घराची भिंत कोसळली. त्यात अंदाजे ८० हजारांचे नुकसान झाले. अर्जुनच्या पत्नीचे गेल्या वर्षी निधन झाले आहे. तो एकटाच घरात रहात होता. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यावेळी होंडा पंचायत, सचिव व मामलेदार कार्यालयातर्फे घराचा पंचनामा करून सोपस्कार पूर्ण करण्यात आले. घरांवर झाडे पडून हानी

मठवाडा केरी सत्तरी येथील इस्माईल हैदर करोल यांच्या पक्क्या घरावर सागवानाचे झाड कोसळले आणि अंदाजे ७५ हजारांचे नुकसान झाले. तसेच मधलावाडा पर्ये सत्तरी येथे प्राजक्ता गावस यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून २५ हजारांचे नुकसान झाले. वाळपई प्रभाग १० मधील नाजीरा खान यांच्या घरावर झाड पडले.

नावेली ३३ केव्ही फिडरवर बिघाड ः फणसवाडी नावेली येथे ३३ केव्ही विद्युत वाहिनीवर बुधवारी दुपारी ३ वाजल्यापासून बिघाड झाल्यामुळे सत्तरी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे वीज खात्याने तातडीने दुरुस्तीकाम सुरू केले. त्यामुळे रात्री उशिरा वीज पुरवठा पूर्ववत झाला. वीज तारांवर झाडे पडत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.

रस्त्यांवर पडझड; वाहतूक खोळंबा

वाळपई ठाणे रस्त्यावर व वीज तारांवर रानटी झाड पडले, दाबोस येथे रस्त्यावर झाडे पडण्याची घटना घडली. म्हाऊस रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळले, होंडा औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर जंगली झाड पडले. पाली सत्तरी येथे जांभळीचे तेंब सत्तरीवर सागवान व अकेशियाची झाडे रस्त्यावर पडली.

नगरगावात रस्त्यावर रबरचे झाड पडले, देऊळवाडा मोर्ले रस्त्यावर तसेच चरावणे येथे जंक्शनवर काजूचे झाड रस्त्यावर पडले. वाळपई अग्निशमन दलातर्फे सर्व ठिकाणी भर पावसात अडथळा दूर करण्यात आला, मात्र काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झालाच. अग्निशमन दलातर्फे ३.५ लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.

आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

सत्तरी आपत्कालीन यंत्रणा सक्रिय असून आज वाळपई भागात झालेल्या पडझडीची अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.वाळपई अग्निशमनतर्फे संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली ए.के. गावकर, ए.एन. देसाई, बाबुराव गावस, साईनाथ सावंत, प्रदीप गावकर, सतीश नाईक, सत्यवान गावस, गंराराम पावणे, अशोक नाईक, संदिप गावकर, सुधाकर गावकर, रुपेश गावकर, इ. कमलिस्कर, तुळशीदास झर्मेकर, विराज नाईक, चंद्रकांत मळगावकर, ज्ञानेश्वर गावस, ज्ञानेश्वर सावंत आदींनी मदतकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT