Chapoli Dam Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: काणकोणची चिंता मिटली, ‘चापोली’ ओव्हरफ्लो तर सासष्टीत भातशेतीचे नुकसान

सततच्या पावसामुळे सासष्टीतील अनेक भागातील भातशेती नष्ट झाली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Chapoli Dam काणकोण तालुक्याची तहान भागविणारा चापोली धरण जलाशय पूर्ण क्षमतेने भरून आज सकाळी वाहू लागला.गेले अनेक दिवस धरण जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतिक्षा होती.सद्या धरण जलाशयात ३८.७५ आर.एल. पाणीसाठा आहे.गेल्यावर्षी १९ जुलैला जलाशय पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला होता. गेल्यावर्षापेक्षा यंदा आठ दिवस उशिरा जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे.

पाऊस जास्त पण...

यंदा गेल्या वर्षीच्या मानाने १२ इंच पाऊस जास्त झाला आहे, मात्र धरण जलाशय पूर्ण क्षमतेने वाहू लागला नाही.त्यावेळी धरण जलाशयात ११२२.३१ हेक्टोमीटर जलसाठा तयार झाला होता आतापर्यंत जलाशयात १०८३.२१ हेक्टोमीटर जलसाठा आहे. गेल्या वर्षीच्या मानाने जास्त पाऊस होऊनही ३९.१० हेक्टोमीटर पाणी साठा कमी आहे.

  • 24 तासात काणकोणात १.७२ इंच पावसाची नोंद

  • आतापर्यंत काणकोणात ९२.७५ इंच पाऊसाची नोंद

शेतजमिनीत पाणी तुंबल्याने नुकसान, सासष्टीतील प्रकार

सतत कोसळत असलेल्या पावसामुळे सासष्टीतील अनेक भागातील भातशेती नष्ट झाली आहे यात कुडतरी, नुवे, वेर्णा, राय, चिंचिणी सह इतर भागातील शेती रोपण साचलेल्या पाण्यामुळे धोक्यात आली आहे असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

शेती रोपण व्यवसायाला राज्य सरकार चालना देत असले तरी मागील दोन वर्षांपासून कोणतीही सबसिडी आम्हाला मिळाली नसल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. शेतीत भात रोपांची लावण करून फायदा काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

प्राथमिक अहवालानुसार संपूर्ण तालुक्यात सुमारे १,५०० हेक्टर भातशेतीचे क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडाले आहे. मडगाव विभागीय कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी शेताची पाहणी करत आहेत आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत.

चिंचणी येथील कोसेसाव व निकलाव दोघा शेतकऱ्यांनी सांगितले,की आमचा शेती व्यवसाय हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. या शेतीतून आम्हला फायदा होवो किंवा नुकसान मात्र आम्ही ही पारंपरिकता जपणार आहोत. या कामात आमची मुलंही आपला काम धंदा सोडून या शेतीत सहकार्य करीत आहेत व सरकरने याची दाखल घेऊन आम्हाला सहकार्य करायला हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT