Goa Farming Dainik Gomantak
गोवा

Goa Farming: राज्यात बियाणे, खत मुबलक प्रमाणात; कृषी विभागाचा दावा: शेतकऱ्यांकडून खतासाठी अनुदानाची मागणी

Goa monsoon Kharif Farming 2026: राज्यात मान्सून दाखल झाल्याने बळीराजा नव्या उत्साहाने शेतीच्या कामांत गुंतला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यात मान्सून दाखल झाल्याने बळीराजा नव्या उत्साहाने शेतीच्या कामांत गुंतला आहे. ग्रामीण तसेच किनारी भागातील शेतांमध्ये सध्या खरीप हंगामाची जोरदार लगबग पाहायला मिळत आहे.

भातशेती लागवडीला सुरवात झाली आहे.

परंतु यंदा आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली असून शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय आहे. सरकारने खताचे वाढते दर पाहता शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, राज्यात भातशेती तसेच इतर पिकांसाठी लागणारे बियाणे तसेच खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे; परंतु खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. ही दरवाढ केंद्रीय स्तरावर होत असते, त्याला नियंत्रित करणे राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्याचे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.

तसेच सर्व गोवा बागायतदार आणि इतर ठिकाणी खतांचा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात खतांचा तुटवडा नाही; परंतु युद्धजन्य स्थितीमुळे खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना खरेदी करणे कठीण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन केले आहे.

राज्यातील बागायती शेती त्या पद्धतीने करता येईल; परंतु भातशेतीसाठी खतांची आवश्‍यकता असल्याचे मत निवृत्त कृषी अधिकारी सत्यवान देसाई यांनी व्यक्त केले.

दरम्यान, शेतकऱ्यांची ही चिंता केवळ खतांपुरती मर्यादित नाही; कारण शेतीचा संपूर्ण खर्चच आता आवाक्याबाहेर गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

VIDEO: 'अमेरिका-पाक युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानसोबत!'; राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ, काँग्रेस-आप आक्रमक

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

SCROLL FOR NEXT