Chorla Ghat Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat: चोर्ला घाटात धबधबे प्रवाहीत, दाट धुक्याची चादर! प्रवाशांचा आनंद द्विगुणित; मद्यधुंद पर्यटकांचा वाढतोय उच्छाद

Chorla Ghat Goa: थंडगार वाहणारा वारा व धुके, अधुनमधून होणारा पावसाचा शिरकाव याच्या सानिध्यामुळे नकळत काही वाहनचालकांची पावलेही चोर्लात काही वेळ थांबली होती.

Sameer Panditrao

वाळपई: सत्तरी तालुक्यात सध्या जोरदार पावसाच्या धारा कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सत्तरी तालुक्यात निसर्गसौंदर्याला उधाण आले आहे.

चोर्ला घाटात रविवारी व सोमवारी तर दाट धुक्याची चादर पसरलेली दिसून आली. दुसरीकडे रस्त्यालगत असलेले धबधबे पावसामुळे पुन्हा प्रवाहित झाल्याने या मार्गावरून जाणारे प्रवासी आपली वाहने थांबवून धबधब्याचा आनंद घेत आहेत. हिरवीगार वनराई, फेसाळणारे धबधबे आणि दाट धुक्याचे हे नयनरम्य दृश्य न्याहाळण्याचा अद्वितीय अनुभव अनेकजण घेत आहेत. मात्र, काहीजण मद्यधुंद अवस्थेत या ठिकाणी धिंगाणा घालताना आढळत आहेत.

चोर्ला घाटात सायंकाळी पूर्णपणे धुक्याने वेढा घातला होता. त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घेत वाहने हाकावी लागली. थंडगार वाहणारा वारा व धुके, अधुनमधून होणारा पावसाचा शिरकाव याच्या सानिध्यामुळे नकळत काही वाहनचालकांची पावलेही चोर्लात काही वेळ थांबली होती. चोर्लातून उंच डोंगरावरून पायथ्याशी असणारी ठाणे, पाली, चरावणे, पाली हिवरे, आदी गावे नेहमीच दिसून येतात, पण दाट धुक्यामुळे ती गावेही दिसेनाशी झाली होती. रस्त्यालगत असणारी जंगली झाडेही धुक्यांच्या प्रवाहामुळे व निसर्गातील बदलांमुळे आपला रंग बदलताना दिसत होती.

रविवारी, सोमवारी सायंकाळी तिन्ही सांजेच्यावेळी अंधार पडेपर्यंत चोर्ला घाटात मध्येच रस्त्यांवर काही लोकांनी चारचाकी, दुचाकी वाहने थांबविली होती व काही लोक मद्यधुंद अवस्थेत नाचत होते. त्यात रस्त्यावर दारुच्या बाटल्या ठेऊन त्यासोबत सेल्फी फोटोग्राफी केली जात होती.

शनिवार, रविवार पोलिसांची गस्त हवी

मद्यधुंद अवस्थेत सेल्फी घेणे, मोठमोठ्याने ओरडणे, संगीताच्या तालावर धिंगाणा घालणे असे प्रकार सर्रासपणे या घाटात होत असतात. त्यामुळे आता शनिवार, रविवारी असे चित्र पहावयास मिळणार आहे. यासाठी शासनाने चोर्ला घाटात कडक पहारा ठेऊन अशा तळीरामांना रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. कारण याचा नाहक त्रास येणारे जाणारे अन्य दुचाकी, चारचाकी वाटसरूंना होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT