सहा घरांत पाणी घुसले, रस्त्यावर दरड कोसळली; गोव्यात पुढील चार दिवस 'यलो अलर्ट'
Landslide In Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2024: सहा घरांत पाणी घुसले, डिचोलीत रस्त्यावर दरड कोसळली; गोव्यात चार दिवस 'यलो अलर्ट'

Pramod Yadav

राज्यात मंदावलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील सर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहेत. राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. राय- दामोन येथील घरांमध्ये पाणी शिरले तर काही भागात दरडी कोसळणे, गटारे तुंबणे, झाडांची पडझड असे प्रकार घडले.

तसेच, डिचोलीतील व्हाळशी ते वाठादेव या चौपदरी बगलमार्गावरील 'ती' धोकादायक दरड सकाळी अखेर कोसळली. यावेळी मार्गावरुन जाणारे दोन दुचाकी चालक थोडक्यात बचावले.

डिचोलीतील व्हाळशी ते वाठादेव या चौपदरी बगलमार्गावरील 'ती' धोकादायक दरड अखेर कोसळलीच. जोरदार पावसाच्या तडाख्यात आज (गुरुवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही दरड बगलमार्गावर कोसळली.

दरड कोसळतानाच बगलमार्गावरून वाठादेव जंक्शनच्या बाजूने जाणाऱ्या दोन दुचाकी सुदैवाने दरडीखाली चिरडण्यापासून सुरक्षित बचावल्या. त्यामुळे संभाव्य भयानक दुर्घटना टळली.

बगलमार्गावरील धोकादायक दरड कोणत्याही क्षणी कोसळणार, अशी शक्यता दहा दिवसांपूर्वीच दै. 'गोमन्तक'ने व्यक्त केली होती. 'गोमन्तक'चे ते वृत्त खरे ठरले आहे. दरम्यान, कोसळलेली दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

राज्यात जरी पाऊस संथगतीने पडत असला तरी पावसाचे प्रमाण अधिक आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे २८ जून ते १ जुलैदरम्यान पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोठे काय घडले?

- व्हाळशी-वाठादेव-डिचोली येथील नवीन चौपदरी बगलमार्गावरील धोकादायक दरड कोसळली.

- डिचोलीत वादळी पावसामुळे झाडांची पडझड.

-राय-दामोन येथे सहा घरांमध्ये घुसले पावसाचे पाणी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: गोवा पोलिसांचा आणखी एक प्रताप! PSI ची महिलेला बेदम मारहाण, 'बूट चाट' म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Goa Crime: जेवण देतो, असं सांगत 16 वर्षांच्या मुलीला फ्लॅटवर नेलं; 58 वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार

Goa Congress: अमित पाटकरांचा गडकरींना ईमेल; कामाची यादी देत मागितली भेटीची वेळ

Pramod Sawant: 'हा हिंदू समाजाचा अपमान', राहुल गांधींनी माफी मागावी, गोव्याचे मुख्यमंत्री आक्रमक

Assagao case: पूजा शर्माची चौकशीला दांडी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

SCROLL FOR NEXT